कोपरगाव शहर वृत्त
मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी माध्यमातील शिक्षण आवश्यक-न्यायमूर्ती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“मातृभाषेतील शिक्षण मुलांना सहज पचनी पडते,संकल्पना स्पष्ट होतात.थोर महापुरुष यांनी देखिल मराठी भाषेतुनच अभ्यास केला असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घ्यावे असे आवाहन कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी नुकतेच कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“संत,महात्मे यांच्या लेखणाची भाषा मराठीच होती.त्यामुळे मराठी भाषेतुन शिकणा-या मुलांनी मनात न्युनगंड न ठेवता शिक्षण घ्यावे व यशस्वी घ्यावे.इंग्रजी भाषेची अनावश्यक भिती बाळगु नये”-न्या.भगवानराव पंडित,अतिरिक्त न्यायदंडाधिकारी,कोपरगाव.
दिनांक १४ ते २८ जानेवारी २०२२ हा पंधरवडा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो कोपरगावात तो उत्साहात संपन्न होत असून कोपरगाव तालुका विधी सेवा समिती व वकील संघ,श्रीमान गोकुळचंदजी विदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने,’मराठी संवर्धन पंधरवडा’ कार्यक्रमाचे उदघाटन नुकतेच संपन्न झाले त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सदर प्रसंगी जेष्ठ सरकारी वकील अॕड.ए.एल.वहाडणे व वकील संघाचे उपाध्यक्ष अॕड.मनोज कडु उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”संत,महात्मे यांच्या लेखणाची भाषा मराठीच होती.त्यामुळे मराठी भाषेतुन शिकणा-या मुलांनी मनात न्युनगंड न ठेवता शिक्षण घ्यावे व यशस्वी घ्यावे.इंग्रजी भाषेची भिती बाळगु नये.शाळा मधुन मराठी भाषेला उंची व दर्जा प्राप्त झाला तर मराठी संवर्धन पंधरवडा आयोजित करण्याची गरज पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.प्रमुख पाहुण्याचे स्वागत पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले तर सुत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विदयालयांचे उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी आभार मानले आहे.