कोपरगाव शहर वृत्त
कोपरगावात…या उपनगरात नागरिकांना पायाभूत सुविधांची वानवा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या ब्रिजलालनगर या उपनगरात अद्याप रस्ते,गटारी,पथदिवे आदी प्राथमिक सुविधा देण्यात आलेल्या नाही त्या त्वरित द्याव्यात अशी मागणी या भागातील महिला व नागरिक यांनी नुकतीच मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना भेटून केली आहे.
कोपरगाव शहराच्या पश्चिमेस साधारण दोन कि.मी.अंतरावर ब्रिजलाल नगर आहे.याठिकाणी अनेक कुटुंबे वास्तव्य करून राहतात.मात्र त्या ठिकाणी वरील कोणत्याही प्राथमिक व पायाभूत सुविधा पालिकेने पुरवलेल्या नाहीत.त्यामुळे त्या परिसरात गटारींची दुर्गंधी वाढत चालली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्याबाबत नागरिकांनी गत ६ सप्टेबर रोजी पालिकेचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्यावर कारवाई शून्य झाल्याने नागरिक संतप्त झाले आहे.
कोपरगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांना आपल्या पायाभूत सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत.वाढीव शहराचे पायाभूत सुविधा पुरविणे हे पालिकेचे कर्त्यव्य असते.मात्र कोपरगावात अनेक उपनगराचे विचित्र वास्तव दिसून येत आहे.अनेक उपनगरात अद्याप चांगले रस्ते नाही,पिण्याचे पाण्याची सुविधा नाही,गटारी नाही,की पथदिवे नाही.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.त्यामुळे नारिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत अशीच घटना कोपरगावात नुकतीच घडली आहे.
कोपरगाव शहराच्या पश्चिमेस साधारण दोन कि.मी.अंतरावर ब्रिजलाल नगर आहे.याठिकाणी अनेक कुटुंबे वास्तव्य करून राहतात.मात्र त्या ठिकाणी वरील कोणत्याही प्राथमिक व पायाभूत सुविधा पालिकेने पुरवलेल्या नाहीत.त्यामुळे त्या परिसरात गटारींची दुर्गंधी वाढत चालली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्याबाबत नागरिकांनी गत ६ सप्टेबर रोजी पालिकेचे लक्ष वेधून घेतले होते.त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते,मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
त्यामुळे पुन्हा एकदा महिला आणि नागरिक यांनी पालिका प्रशासनास आपल्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी आपला मोर्चा वळवला होता.त्यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते.त्यावेळी वरील मागण्या केल्या आहेत.आता पालिका काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.