कोपरगाव शहर वृत्त
कोपरगावातील राडा शहरातील शांततेसाठी मारक-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांच्या दोन गटात दही हंडीच्या जागेवरून व स्वागत कमान उभारण्यावरून वाद निर्माण झाले.दि.१६ रोजी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत याबाबत कुठलाही तोडगा न निघाल्याने मोठा तणाव निर्माण झाला,नेत्यांच्या-पक्षांच्या नावाने प्रचंड घोषणाबाजीही झाली मात्र असा राडा आगामी सणासुदीच्या काळात शहरासाठी पोषक नसल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
“आपल्याला या वादाबाबत माहिती मिळाल्यानंतर आपण संबंधित दोन्ही गटातील प्रमुखांशी चर्चा करून वाद वाढू नये यासाठी समझोता करण्याचा प्रयत्न व विनंती केली होती.पण दोन्ही गटांनी आमचेच म्हणणे बरोबर अशी राणाभीमदेवी भूमिका घेतली होती.असा दावा दोनही गटांचे म्हणणे असल्याने कुणीच माघार घ्यायला तयार नव्हते पुढे लाठी हल्ल्याचा दुर्दवी व अनास्था प्रसंग ओढवला आहे”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
राज्यात आगामी काळात दहीहंडीचा उत्सव येत असून त्याचा कोपरगावात अपवाद नाही.या उत्सवाचा प्रघात दरवर्षी कोपरगाव शहरातही संपन्न होत असतो.त्यासाठी विविध मंडळे नगरपरिषदे कडून रितसर परवानगी घेऊन हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करतात.मात्र यावर्षी हा रीतसर संपन्न होणार उत्सवाला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गालबोट लागले आहे.यावर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपल्याला या वादाबाबत माहिती मिळाल्यानंतर आपण संबंधित दोन्ही गटातील प्रमुखांशी चर्चा करून वाद वाढू नये यासाठी समझोता करण्याचा प्रयत्न व विनंती केली होती.पण दोन्ही गटांनी आमचेच म्हणणे बरोबर अशी राणाभीमदेवी भूमिका घेतली होती.असा दावा दोनही गटांचे म्हणणे असल्याने कुणीच माघार घ्यायला तयार नव्हते.आपण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांच्याशी चर्चा केली.खरे तर सर्व शासकिय अधिकारी हे बाहेरगावाहून आपल्या शहरात आलेले असतात.त्यांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्यच आहे.त्यांनी अनेकदा समजावूनही कुणीच प्रतिसाद न दिल्याने नाईलाजाने लाठीमार करावा लागला.दोन वर्षांच्या खंडानंतर सर्व सण उत्सव साजरे होत आहेत.हे शहर आपले आहे,आपणही जबाबदारीने वागले पाहिजे अशी भूमिका प्रत्येकानेच घ्यायला हवी होती.
प्रमुख राजकिय नेते अनेक निवडणूका एकमेकांच्या समन्वयाने पार पाडत असतांना कार्यकर्त्यांनी एकमेकांत संघर्ष करता कामा नये.यानंतर तर गणेशोत्सवही येणार आहे.शहरात तणावाचे वातावरण रहाणे योग्य नाही.निवडणूक येईल तेंव्हा राजकिय स्पर्धा आवश्य करा,पण इतर वेळी मात्र आपल्या कोपरगावात शांतता-सुव्यवस्था राखणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे असल्याचे प्रातिपादन त्यांनी केले आहे.अन्यथा असाच तणाव रहाणार असेल तर नाईलाजाने शासन कठोर झाले तर आपल्या सर्वांनाच उत्सवांचा आनंद व्यवस्थित घेता येणार नाही याचेही भान असू द्यावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केलं आहे.