कोपरगाव शहर वृत्त
…या पालिकेत नागरिकांना ऑनलाईन सुविधा सुरू !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्यातील नागरिकांना विविध ऑनलाईन सेवा पुरविण्यासाठी आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.त्यामुळे नागरिकांची खाजगी सेतू चालकांकडून होणारी लूट थांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नाही.त्यांनी आज मोठ्या उत्साहात या सेवेचा प्रारंभ नगराध्यक्ष पराग संधान यांचे हस्ते करण्यात आला आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,भाजप गटनेते प्रसाद आढाव,नगरसेवक अतुल काले,स्वप्नील मंजुळ,मुख्याधिकारी सुहास जगताप,उपमुख्यकार्ती अधिकारी मनोजकुमार पापडीवाल आदीसह बहुसंख्येने नागरिक,महिला उपस्थित होत्या.

कोपरगाव शहरातील नागरिकांना वर्तमानात आधार कार्डमध्ये नाव,पत्ता,जन्मतारीख,मोबाईल क्रमांक किंवा बायोमेट्रिक अद्ययावत करण्यासाठी नागरिकांना दूरच्या केंद्रांवर जावे लागते.त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होता ही अडचण लक्षात घेऊन नगरपरिषदेने पुढाकार घेत आधार अपडेट सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.या आधार केंद्र संदीप अर्जुन पाठव हे चालवणार आहे.त्यासाठी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाने महिला ग्रामीण उद्यम विकास च्या वतीने टपरी उपलब्ध करून दिली आहे.



