कोपरगाव शहर वृत्त
आपल्याला शहर विकासाबाबत मुख्यमंत्र्यांचा शब्द -…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
आपण कोपरगाव नगरपरिषद विकासाबाबत कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोललो असून त्यांनी शहर विकासा बाबत शब्द दिला आहे.त्यांनी आगामी काळात दोन तीन महिन्यात कोपरगाव शहरात बोलवणार असून सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“निवडणूक आली म्हणून आम्ही कोणतीही कामे करत नाही.शहर धुळमुक्त करण्यासह,शहराला पाणी देणार आहे.या शिवाय मोकळे भूखंड विकसित करणार आहे.या प्रभागात भाजप आणि कोल्हे कुटुंबियांच्या वतीने कामे झाली असल्याचा दावा केला आहे.आमच्या नेत्यावर विरोधकांनी वैयक्तिक आरोप केले मात्र आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आहे”-पराग संधान,नूतन नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव नगरपरिषद नगरपरिषद निवडणुकीत माजी आ.कोल्हे गटाला अनेक वर्षांनी विजय मिळाला असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान व त्यांच्या १९ सहकाऱ्यांचा जाहीर नागरी सत्कार नव वर्षाच्या निमित्ताने साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आज गुरुवार दि.१ जानेवारी रोजी संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत संचार निगमचे संचालक रवींद्र बोरावके हे होते.
सदर प्रसंगी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,त्यांच्या धर्मपत्नी रेणुका कोल्हे,जिल्हा परिषद माजी गटनेते केशव भवर,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,राजेंद्र सोनवणे,विद्या सोनवणे,उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक,नूतन नगराध्यक्ष पराग संधान,सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

“कोपरगाव नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाची अत्यंत दयनीय स्थिती निर्माण झाली आहे.पाच क्रमांकाच्या तलावाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.शुद्धीकरण प्रकल्पात मृत मासे आढळून आले आहे.त्या प्रकल्पाची दयनियस्थिती प्रत्येक प्रभागातील महिलाना दाखविण्याची गरज आहे”-जितेंद्र रणशूर,नूतन नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”विजयी उमेदवार यापूर्वीही जनसेवेत होते.आताही राहणार आहे.फेट्याबरोबर नगरसेवकांवर जबाबदारी असणार आहे.मागील इतिहास यावेळी पुसला जाणार आहे.मागील वेळी बॅटने वाट लावली होती.बऱ्याच वेळा नगरसेवक एका पक्षांचे तर नगराध्यक्ष पद भलत्याच पक्षांचे असायचे असे सांगून माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांचेवेळी स्पष्ट बहुमत दिले नव्हते.मात्र यावेळी स्पष्ट बहुमताबरोबर नगराध्यक्ष पदही निवडून दिले आहे.त्यामुळे जबाबदारी वाढली आहे.आगामी पाच वर्षात कामाचा लेखाजोखा मांडू त्यावेळी तुमच्या शुभेच्छा भेटणार आहे.कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांनी शहर विकासा बाबत आपल्याला शब्द दिला आहे.त्यांनी आगामी काळात दोन तीन महिन्यात कोपरगाव शहरात बोलणार आहे.याशिवाय आपण आगामी संक्रांतीच्या वेळ पर्यंत स्वच्छता मोहीम राबवणार आहे.आपले शहर स्वच्छतेबाबत देशात आपला ४०२ व्या नंबरवर आहे.तो आपण पहिल्या दहात आणणार आहोत.यावेळी त्यांनी विश्वासनामा आम्ही नगरसेवकांच्या मदतीने राबवणार असल्याचे आश्वासन शेवटी विवेक कोल्हे यांनी दिले आहे.

दरम्यान यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध गायक राहुल खरे यांची भजनसंध्या आयोजित करण्यात आली होती त्याचा आस्वाद सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान,रेणुका कोल्हे आदींसह नगरसेवकानी घेतला असल्याचे दिसून आले आहे.
यावेळी रेणुका कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,”निवारा परिसरात जेव्हढी कामे झाली आहे ती सर्व कोल्हे परिवाराने केली असून आपण या प्रभागात कार्यालयाने स्थापन करून कामे करणार आहे.शिवाय या प्रभागातून पराभूत उमेदवार पल्लवी दडियाल आणि मयूर गायकवाड हे उमेदवार विजयी गृहीत धरून त्यांची कामे केली जाणार आहे.भाजप आणि लोकविकास आघाडीच्या विकासनाम्यामुळे भाजपचा हा विजय झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन स्वराज्याचे काम केले होते.पण या प्रभागात असलेल्या उमेदवारांनी जातीयवादी प्रचार करताना खालच्या स्तरावर जाऊन प्रचार केला असल्याचा आरोप केला आहे.त्याचा आम्ही हिशेब घेणार असल्याचे सुतोवाच केलं आहे.त्यांमुळे निवारा परिसरातील अनेकांनी कान टवकारले आहे.
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले की,”
निवडणूक आली म्हणून आम्ही कोणतीही कामे करत नाही.शहर धुळमुक्त करण्यासह,शहराला पाणी देणार आहे.या शिवाय मोकळे भूखंड विकसित करणार आहे.या प्रभागात भाजप आणि कोल्हे कुटुंबियांच्या वतीने कामे झाली असल्याचा दावा केला आहे.आमच्या नेत्यावर विरोधकांनी वैयक्तिक आरोप केले मात्र आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली असल्याचा दावा केला आहे.निवारा परिसरातील जनतेसाठी आठवड्यातून एक दिवस येऊन बसणार असल्याचे शेवटी संधान यांनी आश्वासन दिले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी शहरप्रमुख कलविंदर दडियाल यांनी केले आहे तर यावेळीभारत संचार निगमचे संचालक रवींद्र बोरावके,
जितेंद्र रणशूर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.तर सूत्रसंचालन संतोष गंगवाल यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेविका दिपा वैभव गिरमे यांनी मानले आहे.
दरम्यान यावेळी कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने सदर कार्यक्रम संपण्याआधीच उपस्थित नागरिकांनी पंगती धरण्यास पसंती दिली असल्याने मान्यवरांना आपली भाषणे आटोपण्याची वेळ आली असल्याचे दिसून आले आहे.
बातमी अद्यावत होत आहे…



