जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या पालिकेत नव्या नवलाईचे दिवस सुरू!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव नगरपालिका निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या उद्देशाने नव्या नवलाईने महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान यांनी कोपरगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये आरोग्य विभागाला बरोबर घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यास प्रारंभ केला असल्याचे दिसून येत आहे.

कोपरगाव शहरात स्वच्छता अभियान या मोहिमेअंतर्गत विवेक कोल्हे,नूतन नगराध्यक्ष पराग संधान दिसत आहेत.

  

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत  कोल्हे गटाला नगराध्यक्षपद कडाकाठावर तर पाच अन्य उमेदवारांना बरोबर घेऊन त्यांचे बहुमत 19 वर गेले आहे.तर आ.काळे गटाच्या जागा 07 वरून 11 वर गेल्या असल्याचे दिसून आले आहे.त्यात आ.आशुतोष काळे यांनी अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्यासाठी आधीच गळ टाकून ठेवल्याने माजी आ.कोल्हे गट सावध पावित्र्यात आला असल्याचे दिसून येत आहे.

   राज्यातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित झालेल्या व राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार,जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी शनिवारी २० डिसेंबर मतदान मोठ्या उत्साहात संपन्न झाले व 21 डिसेंबर रोजी मतमोजणी संपन्न झाली.त्यात कोल्हे गटाला नगराध्यक्ष पद कडाकाठावर तर पाच अन्य उमेदवारांना बरोबर घेऊन त्यांचे बहुमत 19 वर गेले आहे.तर आ.काळे गटाच्या जागा 07 वरून 11 वर गेल्या असल्याचे दिसून आले आहे.त्यात आ.आशुतोष काळे यांनी अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्यासाठी आधीच गळ टाकून ठेवल्याने माजी आ.कोल्हे गट सावध पावित्र्यात आला आहे.त्यामुळे या निवडणुकीत आ.आशुतोष काळे आणि माजी आ.कोल्हे यांना दोघांना मतदारांनी जमिनीवर आणले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे त्यांना आगामी काळात सावध पावले उचलावी लागणार हे उघड आहे.त्यामुळे त्यांनी आपला पदभार घेण्याआधी आरोग्य आणि स्वच्छता अधिकारी,कर्मचाऱ्यांना घेऊन शहर स्वच्छतेचे काम सुरू केले असल्याचे दिसून येत आहे.नव्या नवलाईत ही कामे होताना दिसतात मात्र नंतर त्यात सातत्य राहत नसल्याचे वारंवार नव्हे अनेकदा दिसून आले आहे.याचा शहर वासियाना अनेकदा अनुभव आलेला आहे.त्यामुळे या नव्या दमाच्या गड्यांचा हा उत्साह किती दिवस दिसणार की केवळ फोटो काढण्यापुरता ठरणार हे लवकरच दिसणार आहे.नगरपरिषदेचे ही कामे आधीच ठेकेदारणीने दिलेली असल्याने ही कामे खरेच करणे गरजेचे आहे का असा सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान ज्येष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी भाजपचे कोल्हे गटाचे नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांचा नुकताच सत्कार केला आहे तो क्षण.

   कोपरगाव शहरात स्वच्छता अभियान या मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक सहा येथे स्वच्छता अभियानास सुरुवात झाली असल्याची माहिती हाती आली आहे.सदर प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमादित्य सातभाई,आशिष निकुंभ,यश काले,ओम बागुल,नितीन जोशी,कुणाल कुरे,शुभम भावसार,योगेश अमृतकर,निखिल जोशी,सनी खैरे तसेच इतर युवा कार्यकर्ते,नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.सदर प्रसंगी नवनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान,अतुल काले,आनंद काले आदींनी सदिच्छा भेट दिली असल्याचे आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.त्यामुळे ही मोहीम आगामी किती काळ चालणार असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close