जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

गोदा महोत्सवास वाढता प्रतिसाद

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

संधी मिळाली तर महिला देखील संधीचे सोने करू शकतात याचा विश्वास असल्यामुळे बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी या उद्देशातून आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने गोदाकाठ महोत्सव सुरु करण्यात आला असून या गोदाकाठ महोत्सवाला बचत गटाच्या महिलांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याची प्रतिक्रिया जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

कोपरगाव शहरासह मतदार संघातील नागरिकांनी प्रतिसाद देतांना गोदाकाठ महोत्सवाला कुटुंबासह भेट देवून चार दिवसात खरेदी करतांना मनसोक्त आनंद घेत खरेदीतून मोठ्या प्रमाणात मालाची विक्री झाल्याचे बचत गटाच्या महिलांनी संगितले आहे.

   कोपरगाव येथील महत्मा गांधी प्रदर्शन येथे गोदाकाठ महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.यावेळी स्टॉल धारक बचत गटाच्या महिलांशी चैताली काळे यांनी संवाद साधला.बोचऱ्या थंडीचा विचार न करता कोपरगाव शहरासह मतदार संघातील नागरिकांनी प्रतिसाद देतांना गोदाकाठ महोत्सवाला कुटुंबासह भेट देवून चार दिवसात खरेदी करतांना हात आखडता न घेता केलेल्या मनसोक्त खरेदीतून मोठ्या प्रमाणात मालाची विक्री झाल्याचे बचत गटाच्या महिलांनी यावेळी सांगितले.खानदेशातील प्रसिद्ध असलेल्या खापरावरचे पुरणाचे मांडे तयार करण्यासाठी चार पाच महिला राबत असतांना देखील नागरिकांना हे मांडे घेण्यासाठी नंबर लावावे लागत होते.तर तयार मसाले व घरगुती तयार केलेले विविध कडधान्याचे पापड खरेदी करण्यास महिलांनी पसंती दिली आहे.

  दरम्यान यावेळी जवळपास सव्वा तीनशेच्या वर स्टॉल्सला भेट दिल्यानंतर ग्रामीण संस्कृतीच्या खाद्य पदार्थाचे दर्शन घडविणाऱ्या विविध खाद्य पदार्थाबरोबर वांग्याचे भरीत आणि त्याला जोडी असललेल्या गरम गरम थाली पीठाने नागरिकांच्या जिभेचे चोचले पुरविले तर प्रचंड गर्दी असल्यामुळे कित्येक नागरिकांनी महाराष्ट्राच्या विविध भागांतील अस्सल गावरान चवीच्या दुर्मिळ खाद्यपदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी पार्सल घेवून जाणे पसंद केले.गोदाकाठ महोत्सवाची महती तळुक्यापूर्ती मर्यादित राहिली नसून हि महती सर्वत्र पसरली असल्यामुळे गोदाकाठ महोत्सवाच्या चार दिवसात बचत गटाच्या महिलांनी कोट्यावधीचा व्यवसाय केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close