जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

गोवंश हत्या,पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

    कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गोवंश हत्येचा प्रश्न हिंदुत्ववादी संघटना आणि माध्यमांनी ऐरणीवर आणल्यावर पोलीस आणि कोपरगाव नगरपरिषदेला झोपेतून जाग आली असून त्यांनी आज ०२ शेड कोपरगाव शहर पोलीस आणि नगर येथील दंगल नियंत्रण पथकाची मदत घेत आज सकाळी १०.३० वाजता आयेशा कॉलनी आणि परिसरातील अवैध गोवंश कत्तल करण्याची ठिकाणे उध्वस्त केली असून सहा जणांना नोटीसा दिल्या आहेत.सदर प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे नगरपरिषद आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

  

कोपरगाव नगरपरिषद व शहर पोलीस आदींनी दोन जे.सी.बी.दोन ट्रॅक्टर,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह चार पोलीस अधिकारी,२० पोलीस कर्मचारी,अ.नगर येथील दंगल नियंत्रण पथकाचे २० जवान,आरोग्य विभागाचे २० कर्मचारी आदी लवाजमा घेऊन ही कारवाई सुरू केली होती.त्यातून त्यांनी गोवंश हत्येसाठी वापरण्यात येणारे दोन पत्र्याचे शेड,उध्वस्त केले आहे.तर अन्य सहा जणांना सदर शेड काढून घेण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.

   कोपरगाव शहरात मोठया प्रमाणावर व राजरोस गोवंश हत्या होत आहे.त्यामुळे शहरातील शांतता वारंवार भंग पावत असल्याचे दिसत आहे.त्यासाठी जबाबदार कोपरगाव नगरपरिषद आणि पोलीस अधिकारी त्याकडे कानाडोळा करत आहेत.त्याचा अच्छा-खांसा राग जनतेत धुमसत आहे.अशीच घटना दोन दिवसापूर्वी घडली असून संजयनगर परिसरातील आयेशा कॉलनीत हा गंभीर प्रकार हिंदुत्ववादी संघटनांनी उघड केला आहे.गोदावरी नदीत हे गोवंश हत्येचा सर्व रक्त प्रवाह हा पवित्र गोदावरी नदी प्रवाहांत जात असून नदीचे पावित्र्य भंग पावत आहे.या शिवाय सर्व दूषित पाणी गोदावरी काठी असलेली पवित्र धार्मिक स्थळे आणि जायकवाडी धरणात जाऊन ते नागरिकांना पिण्यासाठी आणि भाविकांना स्नानासाठी वापरावे लागत आहे.या पूर्वीही या संबधी तक्रारी करूनही काही काळ याची दखल घेतली जाते व नागरिकांचे दुर्लक्ष झाले की,पुन्हा त्याचा जोर वाढवला जातो.यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

कोपरगाव नगरपरिषदेतील आयेशा कॉलनी येथील अतिक्रमण काढताना चोख पोलीस बंदोबस्त दिसत आहे.

 

   या संबधी पोलीस,नगरपरिषद आणि राजकीय नेते आपल्या मतांच्या गठ्यासाठी त्याकडे सहज कानाडोळा करताना दिसत आहे.मात्र हिंदू धर्मियांच्या भावनांचा खेळ होतो याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे शहरातील व तालुक्यातील नागरिकांत मोठा असंतोष निर्माण झालेला अनेकवेळा पाहायला मिळाला आहे.यातून मोठा अनर्थ घडू शकतो असे वारंवार आमच्या प्रतिनिधीने लक्षात आणून देऊनही प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे.अशीच घटना नुकतीच दोन दिवसापूर्वी दि.१७ जून रोजी पाहायला मिळाली आहे.त्यातून हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले होते.व आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यातच माध्यमांनी ही गंभीर घटना उचलून धरली होती त्यामुळे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनास झोपेतून जाग आली होती. 

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह चार पोलीस अधिकारी व कर्मचारी आदींनी ही मोहीम फत्ते केली आहे.

   परिणामस्वरूप आज त्याबाबत नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे मोहीम राबवली असून गोवंश कत्तल करण्याचे अड्डे आज उध्वस्त केले आहे.ही मोहीम त्यांनी सकाळी १०.३० वाजता सुरू केली होती.त्यासाठी त्यांनी दोन जे.सी.बी.दोन ट्रॅक्टर,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह चार पोलीस अधिकारी,२० पोलीस कर्मचारी,अ.नगर येथील दंगल नियंत्रण पथकाचे २० जवान,आरोग्य विभागाचे २० कर्मचारी आदी लवाजमा घेऊन ही कारवाई सुरू केली होती.त्यातून त्यांनी गोवंश हत्येसाठी वापरण्यात येणारे दोन पत्र्याचे शेड,उध्वस्त केले आहे.तर अन्य सहा जणांना सदर शेड काढून घेण्यासाठी नोटिसा बजावल्या असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.ही मोहीम कुठल्याही अडथळ्याविना पार पडली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

  दरम्यान आगामी काळात पोलीस अधिकारी आणि नगरपरिषद प्रशासन आदींना डोळ्यात तेल घालून या घटनेकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.मात्र बऱ्याच वेळा जनतेचा रेटा संपला की,”पुन्हा ये रे माझ्या मागल्या…”अशी अवस्था होते हे वारंवार सिद्ध होत आले आहे.
   दरम्यान आगामी काळात पालिकेला मनाई वस्ती या ठिकाणी निर्माण केलेला कत्तलखाना सुरू कसा राहील याकडे डोळे उघडे ठेऊन लक्ष द्यावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close