कोपरगाव शहर वृत्त
प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे…या नेत्याने केले पूजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सकल हिंदू समाजाच्या वतीने सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या पुढाकारातून श्रीलंकेहुन अयोध्येला निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे कोपरगांव शहरात आगमन होताच आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांच्या वतीने मोठया उत्साहात स्वागत केले आहे.

अयोध्येच्या पावन भूमीत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची २२ जानेवारी २०२४ रोजी प्रतिष्ठापना होत असून यानिमित्ताने सुदर्शन वाहिनीचे संपादक,संचालक सुरेश चव्हाणके यांच्या वतीने श्रीलंकेहून थेट प्रभू श्रीरामचंद्रांच्या पवित्र पादुका आणल्या आहेत.त्याचे कोपरगाव शहरात जोरदार स्वागत झाले आहे.
अयोध्येच्या पावन भूमीत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची २२ जानेवारी २०२४ रोजी प्रतिष्ठापना होत असून यानिमित्ताने सुदर्शन वाहिनीचे संपादक,संचालक सुरेश चव्हाणके यांच्या वतीने श्रीलंकेहून थेट प्रभू श्रीरामचंद्रांच्या पवित्र पादुका आणल्या आहेत.या पादुकांचे येवला तालुक्यातून कोपरगावात शहरात विघ्नेश्वर मंदिर येथे आगमन झाले.
यावेळी विघ्नेश्वर मंदिर येथून या पादुकांची पालखीतून कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणुक काढण्यात आली होती.याप्रसंगी आ.आशुतोष काळे हे मिरवणुकीत सहभागी झाले होते.
कोपरगाव शहरातील चौकाचौकात श्रीराम भक्तांनी पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती त्यामुळे संपूर्ण कोपरगाव शहर श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन होवून गेले होते.
यावेळी सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके,पत्रकार प्रदोष चव्हाणके,महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे,राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,ॲड.रवीन्द्र बोरावके,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,मनोहर कृष्णाणी,ॲड.जयंत जोशी,कुकुशेठ सहाणी,विनायक गायकवाड,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे,रमेश गवळी,राजेंद्र वाकचौरे, राजेंद्र खैरनार,प्रशांत वाबळे,वाल्मिक लहिरे, आकाश डागा,शुभम लासुरे,गणेश बोरुडे, शैलेश साबळे,सचिन गवारे,एकनाथ गंगूले, विशाल निकम,रितेश राऊत,अमोल देवकर, महेंद्र अमृतकर,नामदेव मोरे,राहुल हंसवाल, बाळासाहेब अमृतकर,दिलीप सारंगधर, आकाश गायकवाड,वसंत जाधव,मयुर राऊत, कलविंदर डडियाल,सागर महाजन,संतोष गंगवाल,चेतन खुबाणी, संदीप सावतडकर, प्रमोद बंब,संतोष चवंडके,चेतन राणे, सचिन अंबोरे,महेंद्र अमृतकर,जितेंद्र लोढा,विजय बंब, किरण कानडे,जयेशजी बडवे,योगेश गंगवाल,नितीन कुलकर्णी,अनिल गायकवाड,विजय कासलीवाल,आकाश गायकवाड, वेदप्रकाश लोंगाणी,अमोल गोंदकर,अनिरुद्ध काळे आदींसह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.