जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगाव शहराला…यावर्षी नियमित पाणी पुरवठा-आ.काळे

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

कोपरगाव शहरासाठी अत्यंत महत्वाचा असलेला पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १३१.२४ कोटी निधीतून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होवून २०२४ ला निश्चितपणे कोपरगाव शहराला नियमित पाणी पुरवठा होईल असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

“कोपरगाव शहरात पिण्याच्या पाण्यासह विविध शासकीय इमारती,विविध रस्ते,शहर सुशोभीकरण आदी बहुतांशी विविध विकास कामे पूर्ण झाली असून अनेक विकास कामे सुरु आहे त्यास लवकरच यश येणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव शहरातील श्रीरामनगर येथे आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लक्ष रुपये निधीतून ब्राह्मण समाजासाठी बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी १० वी,१२ वी,पदविका व पदवी अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या समाज बांधवांचा आ.काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ब्राह्मण सभा कोपरगावचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर,उपाध्यक्ष गोविंद जवाद,अॅड.जयंत जोशी,बाळकृष्ण कुलकर्णी,सचिव सचिन महाजन,संदीप देशपांडे, सदस्य जयंत बडवे,योगेश कुलकर्णी,महेंद्र कुलकर्णी,गौरीश लहूरकर,सुधाकर कुलकर्णी,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, प्रसाद नाईक,वसंतराव ठोंबरे,संजीव देशपांडे,डॉ.मिलिंद धारणगावकर,अनिल कुलकर्णी,अॅड. श्रद्धा जवाद,वंदना चिकटे,प्रसाद नाईक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,प्रतिभा शिलेदार,दिनकर खरे,राजेंद्र वाकचौरे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,डॉ.तुषार गलांडे समाज बांधव, गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी ते पुढे म्हणाले की,”पूर्वीपासून ब्राम्हण समाज विद्वान समजला जातो त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात ब्राम्हण समाजातील व्यक्ती उच्च पदावर कार्यकर्त आहे हि अभिमानास्पद बाब आहे.काळे परिवाराचे इतर समाजाप्रमाणेच ब्राम्हण समाजाशी जिव्हाळ्याचे सबंध आहेत.कोपरगाव शहरात शासकीय इमारती,विविध रस्ते,शहर सुशोभीकरण अशी बहुतांशी विविध विकास कामे पूर्ण झाली असून अनेक विकास कामे सुरु आहेत.निवडणूक प्रचारावेळी शहरातील नागरिकांच्या घरासमोरील पाण्याच्या असंख्य टाक्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निश्चय केला होता.केलेला निश्चय पूर्ण होवून मागील अनेक वर्षापासूनचा ज्वलंत पाणी प्रश्न येत्या काही दिवसात कायमचा सुटणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close