कला व सांस्कृतिक विभाग
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट करमुक्त करा-कोपरगावात मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या केरळमधील ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणी यांची कथा दाखवण्यात आली आहे.या चित्रपटाला विरोधही होत आहे.मात्र देशात सुरु असलेल्या या क्रूर प्रकरणाला या चित्रपटाने वाचा फोडली असल्याने राज्य सरकारने सदर चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रविकिरण ढोबळे यांनी नुकतीच कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
देशात सुरु असलेल्या या क्रूर प्रकरणाला ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने वाचा फोडली असल्याने राज्य सरकारने सदर चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी करून त्यांनी काल सायंकाळी कोपरगावात हा चित्रपट महिला आणि तरुणींना मोफत दाखवला असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रविकिरण ढोबळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट कोपरगाव शहरात मोफत दाखवला त्यावेळी उपस्थित महिला व कार्यकर्ते.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या केरळमधील ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणी यांची कथा दाखवण्यात आली आहे.या चित्रपटाला विरोधही होत आहे.मात्र हा चित्रपट ३ मुलींच्या सत्यकथेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्याकडून करण्यात येत आहे.देशाच्या राजकारणात सध्या ‘द केरळ स्टोरी’चा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला आहे.एकीकडे पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने चित्रपटाला अजंडा म्हणत बंदी घातली आहे,तर दुसरीकडे काही राज्यांनीही चित्रपट करमुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे.अशा स्थितीत आता काही राज्यांमध्येही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे,तर काही राज्यांमध्ये त्यावर बंदी घालण्याचीही मागणी होत आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त जाहीर केले असून याआधी मध्य प्रदेशातही चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.मात्र महाराष्ट्र राज्यात अद्याप वावर निर्णय झाला नसताना काही संघटना पुढाकार घेऊन मोफत दाखवत आहे.कोपरगावात काही संघटनांनी तो दाखवला आहे.मात्र राज्य सरकारने तो करमुक्त करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष रविकिरण ढोबळे यांनी केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की,”सदर चित्रपट हा वास्तवदर्शी असल्याने तो चर्चेचा ठरला आहे.जिहाद भारताविरुद्ध अतिरेक्यांनी चालविलेली मोठी क्रूर मोहीम आहे.तो प्रश्न केवळ केरळ या एका राज्यापुरता मर्यादित नाही हे समजून घेतले पाहिजे.’तो’ भारतात प्रत्येक राज्यात छुप्या पद्धतीने सुरु आहे.तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे.त्यात अनेक गरीब हिंदू मुली बळी ठरत आहेत.देशातील हिंदू महिला आणि मुलीचे संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्त्यव्य आहे.सदर चित्रपटाने जनतेत जननजागृती होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे राज्य सरकारने हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी ढोबळे यांनी शेवटी केली आहे.
सदर निवेदनावर विकास आढाव,विजय जोशी,चेतन खुबाणी,किरण पानगव्हाणे,चेतन हलवाई,अक्षय जाधव,विक्रम चंदनशिव,गोरख वाडीले आदींच्या सह्या आहेत.