कला व सांस्कृतिक विभाग
…या जि.प.शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या नृत्य आविष्कार व बहारदार गाण्यांच्या सादरीकरणाने वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले आहे.
लहान वयातच मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शासनाकडूच पहिल्या वर्गापासूनच कला,क्रिडा,वकृत्व आदी मध्ये पारंगत होण्यासाठी स्नेहसंमेलन हा स्तुत्य उपक्रम राबविणे सक्तीचे केलेले आहे.
या वर्षीही वारीच्या जि.प.शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी लक्षवेधी व्यक्तीगत,समुहगिते,समुहनृत्य, पारंपरिक,ऐतिहासिक तसेच देशभक्तीपर गीते,नृत्य आदी कलाविष्कार सुव्यवस्थित व निडरपणे सादरीकरण केले.या बहारदार नृत्य व गाण्यांच्या कार्यक्रमाला पालका सह ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चव्हाण,खाडे,जाधव,पोरे,साबळे,सौ.विधाटे आदी शिक्षक वृंदानी महिन्याभर विद्यार्थ्यांकडून तालीम करुन घेतली.शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे उत्कृष्ट फळ विद्यार्थ्यांनी सर्व गाणी व नृत्य आविष्कार लक्षवेधी पद्धतीने सादर केल्याने त्यास श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.