जाहिरात-9423439946
संपादकीय

‘न’ केलेल्या कामाची ‘श्रेय वाटमारी’ नेहमीचीच !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

ज्यांचे भूमिगत गटारीसाठी कवडीचे योगदान नाही.त्यांनी आमच्यामुळे या गटारीचे काम सुरु झाल्याची टिमकी वाजवायला सुरुवात केली असून ज्यांना त्यांच्या कार्यकाळात काही करता आले नाही ते आता न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे मग त्यांनी आपल्या कार्यकाळात काय केल ? असा तिखट सवाल (?) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका माधवी वाकचौरे यांनी भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली आढाव यांना विचारला आहे.हे काही याचवेळी घडलेले नाही यापूर्वीही याचा दाहक अनुभव नागरिकांना आलेला आहे.फरक इतकाच विटी आणि दांडू बदलला आहे.

कोपरगाव तालुक्यातील एका स्व.प्रसिद्ध नेत्याचे आणि माजी मंत्र्यांचे खाजगीत बोलले जाणारे एक वाक्य कार्यकर्त्यांत फार प्रसिद्ध होते.”पैसा दोनच मार्गांनी मिळवता येतो एक जनतेच्या खिशातून,आणि दुसरा सरकारच्या तिजोरीतून” मात्र या महोदयांनी मिळवला तो दोन्ही बाजूनी.आणि आपल्या पुढील सात पिढ्यांचे कोट कल्याण केले.तेंव्हा सुज्ञ मतदारांनी आताच जागे झाले तर उत्तम अन्यथा आपल्यासाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी गुलामीच्या बेड्या तयार आहेच.

कोपरगाव शहरात नगरपरिषद कालावधी संपून स्वव्वा वर्षाचा कालखंड झाला आहे.आता सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या निकालावर पुढील निवडणूकीचे गणित अवलंबून आहे.मात्र न्यायालयाने आता यात जास्त वेळ घेणार नसल्याचे सूतोवाच केलेले आहे.त्यामुळे कधीही नगरपरिषदे बरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि बाजार समितीच्या,निवडणुका कधीही जाहीर शकतात.हा सर्वच राजकीय पक्षांना अंदाज आलेला आहे.त्यामुळे आगामी निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांची अवस्था,”पळे पळे,कोण पुढे पळे तो”ची स्पर्धा सुरु झाली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्यामुळे निवडणुकांना सामोरे जाताना जनतेत विकासाबाबद संभ्रम निर्माण करून आपल्या ‘सत्तेची पोळी’ भाजण्याचे काम जोरात सुरु झाले आहे.कोपरगाव शहर आणि तालुका हि त्याला अपवाद दिसणार नाही.कोपरगाव शहरात आणि तालुक्यात तर राज्याला जनतेस कसे वेड्यात काढायचे याचे नमुने राजकीय नेत्यांनी आपल्या राजकीय जीवनातील पुस्तकात जागोजागी पेरले आहे.त्यामुळे हा ‘श्रेयवाद’ कोपरगाव शहरासाठी नवा नाही.वर्तमानात शहर आणि तालुक्यात हेच चित्र जागोजागी,चौकाचौकात आपल्या न केलेल्या मात्र लावण्यास न विसरलेल्या ‘बॅनर’ वरून दिसत आहे.हेच चित्र भाजप काळातही दिसत होते तेव्हा आताच काही वेगळे झालेले नाही तेंव्हा कोणाला एवढा उर बडवून घेण्याचे कारण नाही.बुब हॉस्पिटल ते श्री छत्रपती संभाजी महाराज चौका पर्यंत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे परिसरातील ‘भूमिगत गटारी’चे केवळ निमित्त आहे.

यापूर्वीही मत पेट्या बंद होई पर्यंत हे ‘गारुड’ तालुक्यातील आणि शहरातील प्रत्येक चौका-चौकात होते आणि त्या एकदाच्या बंद झाल्या की, हे गारुडी आपली ‘पुंगी’,’मुंगूस’ आणि साप घेऊन बेपत्ता होतात.याचा अनुभव नागरिकांना अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा जवळपास अर्धशतक आलेला आहे.कोपरगाव तालुक्यातील औद्योगिक वसाहत असो की,कोपरगाव तालुक्याचे गेलेले अकरा टी.एम.सी.शेती सिंचनाचे पाणी असो,की कालवे दुरुस्तीचे काम असो,निळवंडे कालवे असो की,त्यासाठी साईबाबा संस्थानच्या तिजोरीतील पाचशे कोटीं देण्याचा तमाशा असो,तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती असो,उजनी चारी असो की,औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत असो,तालुक्यात वाढणारी बेरोजगारी असो,कोपरगाव शहरातील अंतर्गत रस्तेच असो की,गटारी,मोकाट जनावरे असो की,शहरातील पिण्याच्या पाण्याचा कधीच न संपणारा प्रश्न असो,नगर-मनमाड,तळेगाव मार्गे कोपरगाव संगमनेर,कोपरगाव-पुणतांबा,उक्कडगाव मार्गे वैजापूर,वाकडी मार्गे श्रीरामपूर या रस्त्याची कधीच पूर्ण न होणारी दुरुस्ती असो,ऊस दराचा वा शेतीमालाचा प्रश्न असो,पोलीस आणि महसूल,विभागातील किंवा पुरवठा प्रशासनातील भ्रष्टाचार असो,आदी प्रश्न सत्तेत कोणीही येवो कधीही संपलेले नाही.यातच काळे-कोल्हे यात दोन्ही घराण्याचे कर्तृत्व. सर्वकाही आले आहे.यात यांचा वाद केवळ जनतेचा प्रश्न सोडविण्याचा प्रसंग आल्यावरच होतो हे विशेष ! यावर तालुक्यातील कोणाही सुज्ञाचे दुमत होणार नाही हे नक्की.आताही निवडणूक जवळ आल्या असल्याने हे गारुड होणार हे ओघाने आलेच.आता कुठे तीन वर्षानंतर आमदार जनतेच्या समस्या दिसल्या असून ‘त्या’महोदयांना विधानभवनात कंठ फुटला आहे.त्याच्या पिताश्रीनी कधी तालुक्याचा प्रश्न दहा वर्षात मांडला नाही.यात नवे काही नाही केवळ ‘विटी’ आणि ‘दांडू’ केवळ बदलला आहे इतकाच काय ‘तो’ तीन पिढ्यातही फरक,मात्र खेळ तोच आणि तोच सुरू आहे.नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीला म्हणे १९०कोटी रुपये निधी मंजूर झाला पण तो पाझर काही अद्याप कोपरगाव शहरापर्यंत पोहचलाच नाही.त्यामुळे जंगली महाराज आश्रम,जनार्दन सामी समाधी मंदिराजवळ,कोपरगाव बेट आदी ठिकाणचा रस्ता काही दुरुस्ती काही झालीच नाही आणि नेत्यांना त्याची गरज कधी वाटलीच नाही.त्यामुळे अपघात होऊन मरणारे आणि लंगडे पांगळे होणारे काही थांबलेच नाही.

तथापि त्यांचे महाविद्यालय मंजुरी असो की,उपपदार्थ निर्मिती असो यात कोणीही कोणाला आडवे आले असल्याचा पुरावा कोणीही दाखवावा.यांच्या शैक्षणिक संस्था असो की,त्यांचे पाणी मंजुरीचे प्रकरण असो त्यात बिचारे कोणी कोणास आडवे आले असले तर दाखवून कोणाही इसमाने देऊन बक्षीस घेऊन जावे.त्यांच्या थेट देशातील असो की,परदेशातील जमिनी असो की,त्यांचे उद्योग वा अन्य मालमत्ता असो कोणी आडवे आले असल्यास आमचे अज्ञान दूर होण्यास मदत होईल.यांचे नातेसंबंध सांगण्याची गरज वाटत नाही बाकी वाचक मित्र म्हणून ‘त’ म्हणता ‘तपिले’ समजून घेण्यास आपण हुशार आहात.

फ्रेडरिक नित्शेचे बाकी विचार काही असले तरी त्याने,’इतिहास हा माणसांच्या आयुष्याशी जोडलेला असायला हवा आणि आपला इतिहास जाणून घेताना किंवा मांडताना आपण भूतकाळाचे गुलाम तर बनत नाही ना ? असा महत्त्वाचा प्रश्न विचारला होता तो आजही कोपरगाव तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्राला तितकाच लागू आहे इतकेच या निमित्ताने.

प्रत्येक उठाव,क्रांती हे काही रणगाडे,बंदुका यांच्या दणदणाटात होत नाही.बऱ्याच गोष्टी बंद दरवाजाआड होतात आणि त्याची आयुधं फक्त पेन-पेन्सिली-कागद ही असतात.त्याच्या साहाय्याने त्या कागदांवर काय लिहिलं गेलं आहे हे नागरिकांना कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो.लोकशाही हातातून निसटून गेलेली असते तोपर्यंत.कायदेशीर,सनदशीर,लोकशाही मार्गानी निवडून आल्यावर हुकूमशाहीचा अंगीकार करणाऱ्यांची उदाहरणं इतिहासात भरपूर आहेत.हुकूमशहांची ही आवडती क्लृप्ती असते.पहिल्यांदा उपलब्ध कायद्याच्या आधारे सत्ता मिळवायची आणि नंतर त्याच सत्तेच्या मदतीनं आपल्या सोईने असेल असा कायदा बदलायचा हा प्रयत्न सातत्याने होत आहे.साठच्या दशकातील सहकार आठवा आणि आजचा सहकार आठवा ‘तो’ पुरावा त्यासाठी पुरेसा आहे.कोपरगाव तालुक्यातील एका स्व.प्रसिद्ध नेत्याचे आणि माजी मंत्र्यांचे खाजगीत बोलले जाणारे एक वाक्य कार्यकर्त्यांत फार प्रसिद्ध होते.”पैसा दोनच मार्गांनी मिळवता येतो एक जनतेच्या खिशातून,आणि दुसरा सरकारच्या तिजोरीतून” मात्र या महोदयांनी मिळवला तो दोन्ही बाजूनी.आणि आपल्या पुढील सात पिढ्यांचे कोट कल्याण केले.तेंव्हा सुज्ञ मतदारांनी आताच जागे झाले तर उत्तम अन्यथा आपल्यासाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी गुलामीच्या बेड्या तयार आहेच.या अभद्र युतीतूनच राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकारी यांना थेट शिव्यांची लाखोली वाहूनही हि मंडळी त्यांना हात का लावत नाही ? यात सर्व काही आले.

फ्रेडरिक नित्शेचे बाकी विचार काही असले तरी त्याने,’इतिहास हा माणसांच्या आयुष्याशी जोडलेला असायला हवा आणि आपला इतिहास जाणून घेताना किंवा मांडताना आपण भूतकाळाचे गुलाम तर बनत नाही ना ? असा महत्त्वाचा प्रश्न विचारला होता तो आजही कोपरगाव तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्राला तितकाच लागू आहे इतकेच या निमित्ताने.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close