करमणूक
कोपरगावात डॉ.गावीत्रे यांच्या,’ढिशक्यांव’ चित्रपटाचे प्रमोशन
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
‘ढिशक्यांव’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्याकडून नुकतेच,’ढिशक्यांव’ या मराठी चित्रपटाचे मोठ्या उत्साहात प्रमोशन करण्यात आले आहे.त्याबद्दल निर्माते डॉ.अशोक गावीत्रे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“कोपरगाव व तालुक्यातील अनेक कलावंतांना आगामी येणाऱ्या चित्रपटात संधी देणार असून अनेक चित्रपट पूर्णत्वाच्या मार्गावर असून ते देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील व ‘ढिशक्यांव’ हा मराठी चित्रपट येत्या १० फेब्रूवारी ला संपूर्ण महाराष्टात प्रदर्शित होत आहे त्याचा सिनेप्रेक्षकांनी लाभ घ्यावा”-डॉ.अशोक गावीत्रे,निर्माते,ढिशक्यांव,मराठी चित्रपट,कोपरगाव.
दरम्यान कोपरगावात यापूर्वी शिवसेनेचे शहर प्रमुख भरत मोरे यांनी ‘मसुटा’ या चित्रपटसह अनेक शॉर्ट फिल्मची निर्मिती केली होती.त्यास अनेक पुरस्कार मिळाले होते.या शिवाय सुदर्शन खंडांगळे यांच्या कथेवर आधारित,’पल्याड’या चित्रपटास अमेरिकेत गौरवले गेले होते.या शिवाय वारी येथील युवक गायकवाड यांनीही ‘प्रेमवारी’ हा चित्रपट वेड पूर्ण करण्यासाठी आपला बराच वेळ आणि पैसा खर्च केला होता.याशिवाय रिक्षा चालक वामन घोलप यांनी,’प्रेमात असे का घडते’ या चित्रपट बनवला होता.या शिवाय दहिगाव बोलका येथील भाऊसाहेब शिंदे यांनीही शॉर्ट फिल्म केल्या होत्या त्यांनाही पुरस्कार प्राप्त झाला होंता.
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील भूमिपुत्र डॉ.अशोक गावित्रे निर्मित “ढिशक्यांव” या मराठी चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त कोपरगांव शहरात दाखल झाली होती.कोपरगावात महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे अल्पबचत गटाचे वस्तू प्रदर्शन सुरु असून याचे औचित्य साधत डॉ.अशोक गावीत्रे व त्यांच्या सहकारी चमूने यांनी ‘ढिशक्यांव’या मराठी चित्रपटाची माहिती उपस्थित पत्रकार आणि मान्यवरांना दिली आहे. सदर प्रसंगी चित्रपट संदर्भात काही प्रश्न या चमुला विचारण्यात आले या चमूकडुन उपस्थित निर्माते डॉ.अशोक गावित्रे यांनी निर्मीती संदर्भात तसेच दिग्दर्शक प्रितम पाटील यांनी चित्रपट संदर्भात माहीती दिली आहे.
या वेळी चित्रपटातील नवीन चेहरा अभिनेते अहमद देशमुख,चित्रपट क्षेत्रात नुकतच पदार्पण केलेली अभिनेत्री मेघा शिंदे,चित्रपटात खलनायकाची भुमीका साकारणारे अभिनेता प्रसाद खैरे यांच्या सोबत दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या.पत्रकार परिषदे पाठोपाठ आ.आशुतोष काळे व चैताली काळे यांच्या मार्गदर्शना खाली प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित कोपरगांवकरांच्या आवडत्या व दरवर्षी आयोजित होणा-या गोदाकाठ महोत्सवात प्रमोशन साठी या चमूचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.ज्या वेळेस संपुर्ण चमूचे आगमण मंचावर झाले त्या वेळी सर्वत्र ढिशक्यांव ¿¿¿ ढिशक्यांव ¿¿¿ असा आवाज प्रेक्षकांमधून येत होता.
सदर प्रसंगी चैताली काळे यांनी या चमूचा सन्मान करत हा चित्रपट सर्वानी बघावा असे उपस्थितांना आवाहन केले आहे.निर्माते डॉ. अशोक गावित्रे,प्रितम पाटील,अभिनेते अहमद देशमुख व अभिनेत्री मेघा शिंदे या कलाकारांकडून उपस्थित प्रेक्षकांच मनोरंजन करण्यात आले व त्यास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.आपल्या कोपरगाव व तालुक्यातील अनेक कलावंतांना आगामी येणाऱ्या चित्रपटात संधी देणार असून अनेक चित्र पट पूर्णत्वाच्या मार्गावर असून ते देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.व ‘ढिशक्यांव’ हा मराठी चित्रपट येत्या १० फेब्रूवारी ला संपूर्ण महाराष्टात प्रदर्शित होत आहे.चित्रपटाचा ट्रीझर दाखवून प्रमोशनचा समारोप करण्यात आला आहे.सदर चित्रपटाचे शूटिंग त्यांनी गोवा आणि पुणे या ठिकाणी केले आहे.तो त्यांनी तो एकवीस दिवसात पूर्ण केला आहे.आता डॉ.अशोक गावीत्रे यांच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे चित्रपट रसिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान डॉ.गावीत्रे यांना चित्रपट निर्मितीचे प्रथमपासून वेड असून त्यांनी यापूर्वी चार वर्षांपूर्वी ‘ए.जी.फिल्म प्रोडक्शन’ हि चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली असून त्या अंतर्गत त्यांनी ‘हेरवाड पॅटर्न’ हि विधवा प्रथा बंदीवर शॉर्ट फिल्म बनवली होती.त्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.तर आगामी काळात त्यांचा,’बिंबन’ हा चित्रपट सहा प्रादेशिक भाषेत येत असून त्याचे काम वेगाने सुरु आहे.
डॉ.गावीत्रे हे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असून ते शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात नऊ वर्षांपासून आपली सेवा देत आहे.त्यांचे अजून एक वैशिष्ट्य असून त्यांनी अवयव दानावर मोठे काम केले असून नेत्रदान,अवयवदान यात मोठे काम आहे.याशिवाय त्यांनी प्रत्येकाचे व्यक्तिमत्व खुलावे व सुंदर दिसावे यासाठी,’ब्युटिबुल फेस ऑफ इंडियन्स’ हि मोहीम सुरु असून त्या अंतरंगात त्यांनी ‘फेस योगाचा प्रसार सुरु ठेवला आहे.