शैक्षणिक
…या जिल्हा परिषद शाळेचे तिहेरी यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांतील सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद अ.नगर यांचेमार्फत जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धांचे आयोजन केले जाते.केंद्र,तालुका व नंतर जिल्हास्तर याप्रमाणे या स्पर्धांचे आयोजन केले जाते.यामध्ये हस्ताक्षर,वेशभूषा सादरीकरण,वक्तृत्व,गोष्ट सादरीकरण,समूहगीत गायन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा या सारख्या स्पर्धा घेतल्या जातात.
दरम्यान या शाळेतील १ ली ते ४ थी (लहान गट) व ५ वी ते ८ वी (मोठा गट) या गटांत देखील समूह गीत गायन स्पर्धेत शाळेतील दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कोरोना काळात बंद झालेला हा उपक्रम जिल्हा परिषदेने चालू वर्षी पुन्हा सुरू केला.कोपरगाव तालुक्यातील तालुकास्तरीय स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.यामध्ये जिल्हा परिषद शाळा पढेगाव येथील ७ वी व ८ वी च्या ( कुमार) गटात कु.अंजली मापारी हिने मोबाईलचे फायदे-तोटे या विषयात वक्तृत्त्व स्पर्धेत उत्कृष्ठ सादरीकरण करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.वेशभूषा सादरीकरणात महाराणी ताराबाई यांची वेशभूषा साकारत कु.गायत्री शिंदे हिने देखील कुमार गटात अति उत्कृष्ठ सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला.या विद्यार्थिनींना शाळेतील पदवीधर शिक्षिका श्रीमती शबाना तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच याच शाळेतील १ली ते ४थी (लहान गट) व ५वी ते ८वी (मोठा गट) या गटांत देखील समूह गीत गायन स्पर्धेत शाळेतील दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यासाठी शाळेतील शिक्षक बाळासाहेब साबळे,संजय महानुभाव,विद्द्युल्लता आढाव,शबाना तांबोळी,शिवगंगा काळेबेरे,इंदूमती वाबळे,शोभा मढवई,रमेश ठोकळ,मंदाकिनी भोसले,आरती वाघ,भैरवनाथ बाराते व मुख्याध्यापक रामभाऊ सोळसे या सर्वांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री राजेंद्र ढेपले,गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख,पढेगावच्या नवनियुक्त सरपंच मीनाताई शिंदे,व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.