ऊर्जा विभाग
कोपरगाव तालुक्यात नविन विद्युत उपकेंद्र मंजूर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ब्राह्मणगाव येथे मंजूर करून घेतलेल्या नवीन ३३/११ के.व्ही.वीज उपकेंद्र उभारणीसाठी ४.८५ कोटीच्या कामाचा व वारी वीज उपकेंद्राच्या ६० लखाच्या क्षमता वाढ कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून कोपरगाव तालुक्यातील वारी,ब्राम्हणगावसह पंचक्रोशीतील गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका प्रसंगी केले आहे.
राज्यातील विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण केले आहे.कोपरगाव मतदार संघातील विज प्रश्न त्याला अपवाद नाही तालुक्यात शेतकऱ्यांना अनेक समस्याचा सामना करावा लागत असून पुरेशा दाबाने वीज मिळणे तर दूरच पण दिवसा वीज मिळणे दुरापास्त झाले आहे.वीज रोहित्रे नादुरुस्त झाल्यावर शेतकऱ्यांना वर्गणी करून ते दुरुस्त करण्याचे काम करावे लागत आहे.या पार्श्वभुमीवर हि बातमी प्रसिद्ध झाली आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”या मंजूर केलेल्या उपकेंद्राच्या नियोजित कामासाठी निधी मिळावा यासाठी आ.काळे यांचा पाठपुरावा सुरू होता.त्या पाठपुराव्यातून ब्राम्हणगाव येथील नवीन ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणीसाठी ४.८५ कोटीच्या कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला आहे.त्यामुळे मागील अनेक दिवसांपासूनच्या ब्राम्हणगाव व परिसरातील गावातील नागरिकांच्या विजेच्या समस्या कायमच्या दूर होणार आहे. त्याचबरोबर या नवीन वीज उपकेंद्राच्या निर्मितीमुळे चास,रवंदे या वीज उपकेंद्राचा भार देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्यामुळे या वीज उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांचा देखील वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने होणार आहे. त्यामुळे ब्राम्हणगावसह पंचक्रोशीतील टाकळी,सोनारी,धारणगाव या गावातील शेतकऱ्यांनी आ.काळे यांचे या कामाबाबद समाधान व्यक्त केले आहे.