जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आयुर्वेद

‘आयुर्वेद प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी आणि आर.जे.एस.आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर,कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आयुर्मेद २०२६’ या तीन दिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली आहे.

   कोकमठाण येथे एस.जे.एस.येथे संपन्न झालेय आयुर्वेद कार्यशाळेच्या माध्यमातून फार्मसी व आयुर्वेद शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण,आंतरशाखीय संवाद व परस्पर समन्वय साधला गेला.पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक फार्मास्युटिकल विज्ञान यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण देण्यात आले.

  आयुर्वेद ही केवळ भारताची प्राचीन वैद्यकीय प्रणाली नसून,ती खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाच्या भविष्याची गरज बनली आहे.आजच्या आधुनिक,गतिमान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानवाला अनेक नवनवीन आजारांचा सामना करावा लागत आहे.अशा वेळी केवळ आजारावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी आयुर्वेद हा एक सर्वोत्तम मार्ग ठरत आहे.आधुनिक वैद्यकशास्त्र (ॲलोपॅथी) अनेकदा आजाराच्या लक्षणांवर तात्कालिक उपचार करते.आयुर्वेद आजाराच्या मुळाशी जाऊन,शरीरातील ‘वात,पित्त आणि कफ’ या त्रिदोषांचे संतुलन बिघडण्याचे कारण शोधून त्यावर उपचार करतो.त्यामुळे आयुर्वेदाला उज्ज्वल भवितव्य असल्याने कोपरगाव नजीकच्या कोकमठाण येथील एस.जे.हॉस्पिटलने आयुर्वेद महाविद्यालयाची सुरुवात केली आहे.त्यासाठी नवनवीन उपक्रम सुरू केले असून नुकतेच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी  आयुर्वेद २०२६’ या तीन दिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

  सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे,आर.जे.एस.समूह संस्थेच्या सल्लागार परिषदेचे सदस्य विजय कडू,दिपक कोटमे,आर.जे.एस.फाउंडेशनचे संचालक प्रणित कातकडे,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.नितीन जैन, आरजेएस आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉ.नारायण पाटील तसेच कॉलेज ऑफ फार्मसीच्या उपप्राचार्या डॉ.उषा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

   या कार्यशाळेच्या माध्यमातून फार्मसी व आयुर्वेद शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण,आंतरशाखीय संवाद व परस्पर समन्वय साधला गेला.पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक फार्मास्युटिकल विज्ञान यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण देण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती प्रक्रियेबरोबरच कच्च्या मालाची गुणवत्ता,उपकरणांचा वापर आणि विश्लेषणात्मक तंत्रज्ञान यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले आल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close