आंदोलन
कोपरगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी कोपरगाव नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी १४ मार्च म्हणजेच आज सकाळ पासून बेमुदत संपावर गेले असून त्यांनी आज काम बंद केले असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेतील आर्थिक वर्षाखेर असताना याचा मोठा ताण प्रशासनावर येणार असून प्राथमिक सेवा कोसळणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी या आंदोलनात सहभागी नाही असा दावा केला असून या संपाचा कामावर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा केला आहे.तर आंदोलस्थळी आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता काही अधिकारी संपात सहभागी आढळून आले आहेत.व त्यांनी आमचा या संपास पाठींबा असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे या दोन विरोधाभासी प्रतिक्रियामूळे नागरिकांत संभ्रम तयार झाला आहे.
राज्यातील बहुतेक सर्वच शासकीय विभागातील कर्मचारी जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी आक्रमक झाले आहेत.विरोधी पक्षांनी देखील सरकारकडे तशी मागणी केली आहे.त्यामुळे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती.मात्र ती काळ निष्फळ ठरली असल्याचे समजते त्यामुळे आज मंगळवारपासून शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु झाला आहे.कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी त्याला अपवाद नाही.त्यांनीही संपाचा शंखनाद केला असून तो अंमलात आणला आहे.त्यामुळे आज पालिकेच्या सर्व सेवा ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले आहे.सदर ठिकाणी आमच्या प्रतिनिधीने कार्यालयात भेट दिली असता सर्व कार्यालयात शुकशुकाट दिसून आला आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,”नगरपरिषदेचे कामात सकाळी काही काळ व्यत्यय आला असल्याचे कबुल केले आहे.मात्र काही काळाने ते काम पूर्ववत सुरु झाले आहे.ते काम नियमित सुरु रहाणार असून नागरिकांनी आपलें घर,पाणी पट्टी व गाळे भाडे आदी नियमित भरणे सुरु ठेवावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.
आंदोलन कर्त्यांनी आपल्या मागण्यात म्हटले आहे की,”राज्यातील नगरपरिषद,नगरपंचायत,राज्य संवर्ग कर्मचारी,स्थानिक नगरपरिषद कर्मचारी व रोजंदारी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना निवेदन दिलेले आहेत.तसेच नगरविकास मंत्री यांचे सोबत बैठक होवूनही अद्याप पर्यंत नगरपरिषद,नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी यांच्या सोबत जोडलेल्या मागण्या प्रलंबित असल्याचा त्यांचा दावा आहे.या मागण्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे त्यांचा सरकारवर अच्छा-खांसा राग आहे.परिणामी सर्व संघटनांनी एकत्रित येवून महाराष्ट्र राज्य नगरपालिका महासंघ तयार केलेला आहे व आपल्या मागण्यांबाबत आधी जो पर्यंत कोणताही निर्णय होत नाही त्यासाठी पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला होता.मात्र त्याची दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी आज दि.१४ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपासून कोपरगांव नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी बेमूदत संपावर गेले आहे.