जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

शेतकऱ्यांच्या कर्मुक्तीसाठी सरकारला सद्बुद्धी द्या”-…या महाराजांकडे मागणी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी वारंवार समोर येत असूनही जाहीर आश्वासन देऊनही सरकारला घाम फुटताना दिसत नाही त्यामुळे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी जिल्हा शेतकरी संघटनेने संत गंगागारीजी महाराज यांच्या सप्ताहात महंत रामगिरीजी महाराज यांचेकडे सरकारला सद्बुद्धी देण्याचे आर्जव केल्याने याचे शेतकऱ्यांनी सर्वत्र स्वागत केले आहे.

शेतकरी संघटनेने संत गंगागारीजी महाराज यांच्या सप्ताहात महंत रामगिरीजी महाराज यांचेकडे सरकारला कर्जमुक्तीबाबत सद्बुद्धी देण्याची मागणी करताना नेते आणि कार्यकर्ते.

 

“राजकीय आणि साखर कारखानदार भ्रष्ट नेत्यांनी बोगस कर्ज घेणाऱ्या उद्योजकांनी राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा आणि नाजूक करून ठेवली आहे.इतिहासात ज्या ज्या वेळी राज्यावर गंभीर संकट आले त्या त्या वेळी राज्यातील आणि देशातील साधू आणि संतांनी मोठी भूमिका निभावली आहे.मग ते समर्थ रामदास स्वामी असो की संत गंगागिरीजी महाराज असो आता आपण या संत व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडाल”-अनिल औताडे,अध्यक्ष,अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटना.

  सन -१९९५ ते २०१३ पर्यंत एकूण ०२ लाख ९६ हजार ४३८ भारतीय शेतकरी आत्महत्या करून मरण पावले आहेत.याच कालावधीत, कुपोषण,रोग आणि आत्महत्या यासह इतर कारणांमुळे भारतात दरवर्षी सुमारे ९.५ दशलक्ष लोक मरण पावले किंवा १९९५ ते २०१३ या काळात सुमारे १७१ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे.राज्यात आणि देशात कोणाचेही सरकार येवो यात खंड पडलेला नाही हे विशेष ! त्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते चिंताक्रांत बनले आहे.राजकीय नेते दुष्काळी शेतकऱ्यांचे पाणी चोरून दारू कारखान्यांना वापरत आहे.अशा स्थितीत राजकीय व्यवस्था शेतकऱ्यांना वाचविण्यात अपयशी ठरल्याचे ठळकपणे दिसून येत आहे.अशा स्थितीत संत आणि ईश्वरच त्यांना वाचवू शकतो हे ओळखून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या  वैजापुर तालुक्यातील शनिदेव गाव येथे गोदाधाम येथील महंत रामगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनात संपन्न झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात भेट देऊन ही मागणी आणि आर्जव केले आहे.

  त्यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,तालुका अध्यक्ष युवराज जगताप,डॉ.दादासाहेब आदिक,डॉ.विकास नवले,संतोष पटारे,इंद्रभान चोरमळ,दिलीप औताडे,शैलेश वमने,राजेंद्र चोरमल,राहुल चोरमल,अकबर शेख,ठकचद आढाव,गोरख पवार,कडू पवार, नारायण पवार आधी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या सहा सात दशकांपासून शेती धंदा हा सरकारच्या धोरणामुळे तोट्याचा झाला आहे. गेल्या चार दशकांपासून अनेक सरकारी आलीं व गेली.परंतु शेतकरी समस्या कमी न होता वाढच झालेली आहे.याबाबतचा परिणाम राज्यातील शेतकरी आत्महत्तेत वाढ झालेली आहे.शेतकऱ्यांचे दुःख जगाच्या वेशीवर टांगण्याचे काम शेतकरी संघटनेचे नेते स्व.शरद जोशी,स्व.बबनराव काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आजन्म केले आहे.त्यांचा वारसा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील,राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे आदी समर्थपणे चालवत आहेत.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राजकीय आणि साखर कारखानदार भ्रष्ट नेत्यांनी बोगस कर्ज घेणाऱ्या उद्योजकांनी राज्याची आर्थिक स्थिती राजकीय नेत्यांनी तोळामासा आणि नाजूक करून ठेवली आहे.इतिहासात ज्या ज्या वेळी राज्यावर गंभीर संकट आले त्या त्यावेळी राज्यातील आणि देशातील साधू आणि संतांनी मोठी भूमिका निभावली आहे.मग ते समर्थ रामदास स्वामी असो की संत गंगागिरीजी महाराज असो.यात संत गजानन महाराज,संत साईबाबा,स्वामी समर्थ,संत नारायणगिरीजी महाराज आदींचा त्यात समावेश आहे.आज देशातील बडे कर्जबुडवे उद्योजक,साखर कारखानदारांनी शेतकरी आणि शेतमजूर यांना भिकेला लावले आहे.शेतकऱ्यांचा खिसा आणि सरकारी तिजोरी आदी दोन्ही ठिकाणी हात मारून देशाच्या आर्थिक घडीला उध्वस्त करून टाकले आहे.अशावेळी या भ्रष्ट नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा करता येत नाही.अशावेळी गोदाधामचे महंत रामगिरीजी महाराज हेच जनतेच्या बळावर राजकीय व्यवस्थेला नारायणगिरिजी महाराज यांच्यासारखे ठिकाणावर आणू शकतात आपण त्याचा श्रेष्ठ वारसा जपण्याचे कार्य करत आहात.आपल्या समाज प्रबोधन कार्याची ख्याती अहिल्यानगर, संभाजीनगर,नाशिकसह संपूर्ण राज्यात पसरली आहे.आपल्या समाज प्रबोधन हिंदूधर्म कार्यामुळे समस्त मानव जीवनातील नैराश्य घालविण्याचे कार्य आपण करत असून सप्ताह कार्यकाळात भक्तांमध्ये मोठे नवचैतन्य निर्माण होत आहे.गेल्या अनेक पिढ्यांपासून शेतकरी आणि शेतमजूर हा  परंपरा असलेल्या संतांचा भक्त असलेने टिकून आहे.


मागील गेल्या सहा सात दशकांपासून शेती धंदा हा सरकारच्या धोरणामुळे तोट्याचा झाला आहे. गेल्या चार दशकांपासून अनेक सरकारी आलीं व गेली.परंतु शेतकरी समस्या कमी न होता वाढच झालेली आहे.याबाबतचा परिणाम राज्यातील शेतकरी आत्महत्तेत वाढ झालेली आहे.शेतकऱ्यांचे दुःख जगाच्या वेशीवर टांगण्याचे काम शेतकरी संघटनेचे नेते स्व.शरद जोशी,स्व.बबनराव काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आजन्म केले आहे.त्यांचा वारसा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील,राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे आदी चालवत आहेत.मात्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील झाले आहे.
मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत शेतकरी संघटनेसह अनेक साधुसंतांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देऊन सत्तेत आणले होते.भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आपल्या जाहीरनाम्यात आश्वासित केले होते.परंतु याबाबतचे आश्वासन सरकारकडून पाळले जात नाही.गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी नेते लोकशाही मार्गाने आंदोलने छेडत आहे.परंतु सरकार याबाबतची दखल घेताना दिसत नाही.

भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आपल्या जाहीरनाम्यात आश्वासित केले होते.परंतु याबाबतचे आश्वासन सरकारकडून पाळले जात नाही हे विशेष !

त्यामुळे सहाजिकच महाराज आपल्या वाणीमध्ये मोठी ताकद आहे.आपणाला सूचित करण्या इतकी आमची उंची नाही परंतु एक शेतकरी भक्त म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करत आहोत की,”आपण राज्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या वतीने सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती  बाबत प्रबोधन केल्यास परमेश्वर सरकारला सद्गबुद्धी देऊन आपला सर्वसामान्य भक्त हा सामान्य शेतकरीच असल्याने त्यांना कर्जमुक्त केल्याने त्यांना एक चांगले सन्मानाचे जीवन जगता येईल व मानवी जीवनाचे सार्थक होऊन त्यांचे जीवनात आनंद येईल असा आशावाद अनिल औताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.या मागणीची संभाजीनगर,नाशिक,नगर आदी जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होत आहे.

मो.- 7066 227 227.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close