
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गरीब दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेस सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात १२ एप्रिल २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरु केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेच्याअधिकाऱ्यांसमवेत आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच पंचायत समिती कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत पुढे बोलतांना ते म्हणाले की,”प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा कणा आहे.त्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करतांना ज्या गोष्टींची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे अशा गोष्टींच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे त्याबाबत सविस्तर अहवाल तयार करून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांना अजूनही काय सुविधा देता येतील यासाठी प्रयत्न करावा व शक्य असल्यास दुरुस्तीच्या आराखड्यात बदल करावा.प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करतांना कामाचा दर्जा उच्च असावा. दुरुस्ती कामात केलेली दिरंगाई सहन केली जाणार नाही अशी ताकीद आ. काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिली आहे.