जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’ती’ बेकायदेशीर व्यायामशाळा बंद करा अन्यथा उपोषण-इशारा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत गांधीनगर हद्दीत ‘शंकर गार्डन’ येथे दत्ता पुंडे यांनी बेकायदा सुरु केलेली व्यायामशाळा बंद करावी अशी मागणी माजी नगरसेवक मेहमुद सय्यद यांचेसह त्या परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे प्रशासक शांताराम गोसावी यांचेकडे एका निवेदनाद्वारे नूकतीच केली आहे.त्यामुळे गांधीनगरसह शहरात खळबळ उडाली आहे.

“आपण या ठिकाणची ५०-६० वर्षापासून स्वच्छता करत असून नगरसेवक झाल्यापासून तर अधिकचे लक्ष देऊन त्या जागेची देखभाल केली असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे या प्रश्नी आपणास बोलण्याचा नैतिक अधिकार आहे”-मेहमूद सय्यद,माजी नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.

त्यांनी मुख्याधिकारी याना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”गांधीनगर भागात सदर ठिकाणी या पूर्वी मोठे कचऱ्याचे ढीग होते.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता.आपण या प्रकरणी नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करून तेथील मोठ्या प्रमाणावरील कचरा हटवला आहे.त्यासाठी आपण लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांसाठी एक बगीचा प्रस्तावित केला आहे.व त्यासाठी संरक्षण भिंत बांधली आहे व त्या ठिकाणी सेनेचे माजी शहर प्रमुख शंकर घंगारे यांचे स्मरणार्थ नगरपरिषदेचा ठराव क्रं.३६/२०२१ दि.१७ डिसेंबर २०२१ रोजी करून त्या ठिकाणी बगीचा प्रस्तावित केला आहे.या भागात नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोठी व प्रशस्त जागा नसल्याने सदर ठिकाण हे सर्व धर्मियांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे.या शिवाय आ.आशुतोष काळे यांच्याकडे सभामंडप व शाळेच्या वर्गखोल्या प्रस्तावित केलेल्या आहेत.मात्र त्या ठिकाणी त्या भागात राहणारे दत्ता पुंडे यांनी कोणालाही विश्वासात न घेता अतिक्रमण करून ते झाकण्यासाठी त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे.व त्या जागी क्रीडा व व्यायाम साहित्य आणले आहे.त्यामुळे त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा दावा केला आहे.

गांधीनगर या ठिकाणी सेनेचे माजी शहर प्रमुख शंकर घंगारे यांचे स्मरणार्थ नगरपरिषदेचा ठराव क्रं.३६/२०२१ दि.१७ डिसेंबर २०२१ रोजी करून त्या ठिकाणी बगीचा प्रस्तावित केला आहे.या भागात नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोठी व प्रशस्त जागा नसल्याने सदर ठिकाण हे सर्व धर्मियांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे”-मेहमूद सय्यद,माजी नगरसेवक.


  सदर ठिकाणी जागा हि भुसभुशीत असून व्यायाम शाळेसाठी योग्य नाही असा त्यांनी दावा करून त्या ठिकाणी अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते असा दावा केला आहे.व सदर साहित्य तातडीने काढून घ्यावे असे आवाहन केले आहे.अन्यथा आपण आगामी २५ जानेवारी रोजी कोपरगाव नगरपरिषेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलन प्रश्नी त्यांनी अ.नगर येथील जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक,आ.आशुतोष काळे,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक,तहसीलदार आदींना निवेदन पाठवले असून निवेदनावर १५० नागरिकांच्या सह्या असल्याचा दावा केला आहे.

  सदर प्रसंगी माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी,”आपण या ठिकाणची ०७-०८ वर्षापासून स्वच्छता करत असून नगरसेवक झाल्यापासून तर अधिकचे लक्ष देऊन त्याची देखभाल केली असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे या प्रश्नी आपणास बोलण्याचा नैतिक अधिकार असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close