कोपरगाव तालुका
कोपरगाव येथे साधूच्या दफन निधीवरून वादंग,पोलिसांचा गर्दीवर गुन्हा दाखल

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य तसेच आत्मा मलिक परिवारा मध्ये कार्यरत असलेले संत अमरगिरीजी महाराज यांचे काल दि.१८ मार्च रोजी पहाटे आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना कोरोनाने देहावसान झाले असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना न करताच आत्मा मलिक हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी तो नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने त्यावरून वादंग निर्माण झाले असून त्या मृतदेहास तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाने दफन विधीस प्रतिबंध केल्याने त्यांचे भक्तगण व नातेवाईकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
“आमचे कडे सर्वाधिक चांगले डॉक्टर असल्याचा दावा करून कोरोना उपचार केंद्र गतवर्षी बंद केलेले असताना माणुसकी म्हणून आम्ही सदर रुग्णांस अत्यन्त अत्यवस्थ स्थितीत भरती केले आहे.व त्यांना कोपरगावात कोणत्याही रुग्णालयाने उपचारासाठी न घेतल्याने रात्रीच्या सुमारास आम्ही आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत चांगली सेवा दिली आपण जागून त्या ठिकाणी लक्ष ठेऊन होतो.त्यामुळे उपचारानंतर ते उठून बसले सकाळी त्यांनी चहा व अन्य नैसर्गिक विधी केल्याने ते चांगले झाले असताना त्यांना एका अचानक क्षणी पक्षघाताचा झटका आल्याने त्यात त्यांचे निधन झाले आहे”-अमित फरताळे, व्यवस्थापक,आत्मा मालिक हॉस्पिटल.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”संत जनार्दन स्वामी यांचे शिष्य अमरागिरीजी महाराज यांचा निवास अलीकडील काळात जंगली महाराज आश्रमात होता.दरम्यान राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना त्याला कोपरगाव तालुकाही अपवाद नाही.या ठिकाणी कोरोना रुग्णांत मोठी व लक्षवेधी वाढ झाली आहे.त्यात संत अमरागिरीजी महाराज यांनाही कोरोनाची लागण झाली त्यांचे वय जास्त असल्याने त्यांना आत्मा मलिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.दरम्यान या दरम्यान त्यांचे निधन झाले आहे.त्यांच्यावर त्यांच्या भक्तपरिवार व नातेवाईकांची इच्छा हि त्यांच्या अंतिम इच्छेनुरूप त्यांचे त्यांच्या मूळ गावी दफन विधी व्हावा व त्या ठिकाणी समाधी बांधण्यात यावी अशी होती.त्यांची अंतिम इच्छेनुरूप त्यांच्या संगमनेर तालुक्यातील कऱ्हे या मूळ गावी त्यांचा दफन विधी व्हावा या साठी नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह ताब्यात द्यावा अशी मागणी भक्तगण व नातेवाईकांनी केली मात्र तालुका प्रशासन व पोलीस अधिकारी यांनी त्यास विरोध केला.व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने असे करण्यास प्रतिबंध असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने पेच तयार झाला होता.अखेर प्रशासनाने नियमानुसार अशा मृतदेहाची विल्हेवाट हि दहन संस्कार करून करण्याचा नियम असल्याने त्या प्रमाणे हा विधी कोपरगाव येथील गोदावरी काठी कोपरगाव बेट येथील स्मशान भूमीत केला आहे.
दरम्यान हा मृतदेह आत्मा मलिक हॉस्पिटलने कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी कोणतीही प्रतिबंधात्मक उपाय योजना न करताच ताब्यात दिल्याने त्या प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाच तहसीलदार योगेश चंद्रे यांनी एका वृत्त वाहिणीशी बोलताना केल्याने आगामी कालखंडात प्रशासन काय कारवाई करते ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान अंत्यविधीसाठी वीस पेक्षा जास्त नागरिक अथवा नातेवाईकांना परवानगी नसताना या ठिकाणी भक्त व नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी या गर्दीवर भा.द.वि.कलम गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी करीत आहेत.
दरम्यान याबाबाबत आमच्या प्रतिनिधीने तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही तर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी या घटनेला दुजोरा दिला असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.या बाबत आत्मा मलिक हॉस्पिटलचे प्रशासक अमित फरताळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”प्रथम उठणाऱ्या वावड्याबाबत नाराजी प्रदर्शित केली व आमच्या प्रतिनिधीने त्यांना विश्वासात घेऊन बोलते केल्यावर त्यांनी,”आमचे कडे सर्वाधिक चांगले डॉक्टर असल्याचा दावा करून कोरोना उपचार केंद्र गतवर्षी बंद केलेले असताना माणुसकी म्हणून आम्ही सदर रुग्णांस अत्यन्त अत्यवस्थ स्थितीत भरती केले आहे.व त्यांना कोपरगावात कोणत्याही रुग्णालयाने उपचारासाठी न घेतल्याने रात्रीच्या सुमारास आम्ही आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत चांगली सेवा दिली आपण जागून त्या ठिकाणी लक्ष ठेऊन होतो.त्यामुळे उपचारानंतर ते उठून बसले सकाळी त्यांनी चहा व अन्य नैसर्गिक विधी केल्याने ते चांगले झाले असताना त्यांना एका अचानक क्षणी पक्षघाताचा झटका आल्याने त्यात त्यांचे निधन झाले असल्याचे सांगितले आहे.व माध्यमात उठणाऱ्या वावड्याबाबत नापसंती व्यक्त केली आहे”.व प्रशासबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार देऊन हताशता व्यक्त केली आहे.