जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

‘त्या’अभागी मुलीचे शासनाने पालकत्व घ्यावे-मोर्चात मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या मात्र सासर निफाड तालुक्यातील असलेल्या आदिवासी महिलेचे बाळंत पणात योग्य उपचार न मिळाल्याने निधन झाल्याने आज एकलव्य आदिवासी परिषद संघटनेने कोपरगाव तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.त्यात सदर नवजात मुलीचे शासनाने पालकत्व घ्यावे,त्या कुटुंबास भरपाई मिळावी,यात दोषी असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आदी मागण्या केल्या आहे.त्याला आदिवासी बांधव व महिलांना मोठा प्रतिसाद दिला आहे.

सदर प्रसंगी त्यांनी चासनळी व धामोरी येथील जबाबदार डॉक्टर आणि त्यांच्या सहकऱ्यांना अटक करा,मयत महिलेच्या कुटुंबास भरपाई द्या,नवजात मुलीचे शासनाने पालकत्व घ्यावे,कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत घ्यावे आदी मागण्या केल्या आहेत.

कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील मूळ रहिवासी असून तिचे काही वर्षांपूर्वी निफाड तालुक्यातील वडाळी येथील तरुणाशी लग्न झाले होते.ती नुकतीच आपल्या माहेरी बाळंतपणासाठी आली होती.तिचे दिवस भरल्याने तिला जवळच्या चासनळी येथील प्राथमिक उपचार केंद्र येथे नेले असता त्या ठिकाणी दवाखान्यात कर्तव्यावर असलेले आरोपी डॉ.साहिल त्र्यंबक खोत,डॉ.साक्षी कैलास सेठी आदी आपल्या कर्तव्यावर हजर नव्हते.परिणामस्वरूप तिला वेळेवर उपचार मिळाले नाही.तर तेथील रुग्णवाहिका चालक संजय शिंदे याने आपल्या रुग्णवाहिकेत पुरेसे इंधन भरून ठेवले नाही त्यामुळे तिला अन्यत्र उपचारार्थ नेता आले नाही परिणामी तिचा उपचाराभावी मोठा रक्तस्राव होऊन मृत्यू झाला आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.

दरम्यान या प्रकरणी या परिसरातील नागरिकांनी या आरोग्य व्यवस्थेचा निषेध व्यक्त केला आहे.एकलव्य आदिवासी परिषद संघटनेच्या वतीने आज कोपरगाव तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता.त्यावेळी हि मागणी केली आहे.दरम्यान यात प्रथमोपचार करणाऱ्या धामोरी येथील महिला वैद्यकीय अधिकारी व त्यांची सहकारी यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी आदी मागण्या केल्या आहेत.

दरम्यान या संबंधी आरोपी अटक करण्याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,सदर गुंह्यातील आरोपी अटक केलेले नसल्याचे सांगितले आहे.सदर आरोपी कलम ३०४(अ) यामधील असल्याने पळून जाण्याची शक्यता नसल्याने व तालुक्यात मुख्यमंत्र्यासह मान्यवरांचे दौरे असल्याने सदर आरोपीस अटक करण्यास वेळ मिळाला नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.

सदर प्रसंगी मंगेश औताडे,अमित आगलावे,अंबादास धनगर,किरण गांगुर्डे,माजी पंचायत समितीचे माजी सदस्य उत्तम माळी,विजय कंक,रमेश पवार,सागर वाघ,समीर माळी,जयराम बेंडकुळे,आर.पी.आय.चे विभागीय अध्यक्ष दीपक गायकवाड,संजय देशमुख,ज्योती माळी,सोनवणे ताई,सुनीता बर्डे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर प्रसंगी त्यांनी चासनळी व धामोरी येथील जबाबदार डॉक्टर आणि त्यांच्या सहकऱ्यांना अटक करा,मयत महिलेच्या कुटुंबास भरपाई द्या,नवजात मुलीचे शासनाने पालकत्व घ्यावे,कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत घ्यावे आदी मागण्या केल्या आहेत.

सदर प्रसंगी निवेदन प्रभारी नायब तहसीलदार यांनी स्वीकारले आहे.त्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप,आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी सदर मोर्चा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्यापासून सुरु करून तो गुरुद्वारा रोडने तहसील कार्यालयाकडे घोषणा देत नेण्यात आला आहे.त्यावेळी आदिवासी महिला,पुरुष,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यावेळी कोपरगाव शहर पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता.

त्यावेळी आंदोलन कर्त्यांनी तहसीलदार यांचेकडून कारवाईसाठी व सदर मुलीचे पालकत्व स्विकारण्यासाठी लेखी घेण्याच्या अटीवर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.त्यावेळी आंदोलन कर्त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close