धार्मिक
कोपरगाव तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील दोन वर्ष कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे कोपरगाव तालुक्यात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणारा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता.मात्र यावर्षी कोरोना संकटाची तीव्रता कमी झाली असून सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहे.मात्र यावर्षी हा त्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर गणेशोत्सवानिमित्त माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोसाका सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने गणेश चौक गौतमनगर याठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली असून मंडळाचे हे ६८ वे वर्ष आहे.