जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

शिर्डी साईबाबा संस्थानाला एक कोटींची देणगी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हैद्राबाद येथील दानशुर साईभक्‍त श्री.राजेश्‍वर यांनी आपले फर्म साई कृपा वेंचरच्‍या नावे श्री साईबाबा संस्‍थानला मेडीकल फंडकरीता रुपये २५ लाखांचे ०४ डिमांड ड्राफ्ट असे एकुण ०१ कोटी रुपये देणगी दिली असून सदर देणगीचे डिमांड ड्राफ्ट संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍याकडे सुपुर्त केले आहे.

दरम्यान हैद्राबाद येथील ओम श्रीराम बिल्‍डर्सचे श्री.सुभ्‍बा रेडडी हे त्‍यांच्‍या वाढदिवासा निमित्‍त श्री साईबाबा हॉस्पिटलकरीता सुमारे ४० लाख रुपये किंमतीचे एक्‍सरे मशिन देणगी देणार असल्‍याचे ही श्री.राजेश्‍वर यांनी या वेळी सांगितले. या प्रसंगी संस्‍थानचे मुख्‍यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास खराडे उपस्थित होते.

याबरोबरच चेन्‍नई येथील देणगीदार साईभक्‍त श्री.व्‍ही.जितेंद्र यांनी ५४४ ग्रॅम वजनाची २७ लाख ७७ हजार ६६४ रुपये किंमतीची सोन्‍याची आरती श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिली.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close