जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अर्थकारण

सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण-…यांची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्हा स्थैर्य निधी सहकारी संघ ज्याप्रमाणे लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंडाच्या आधारे पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देते,त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या हमीद्वारे पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी दिली आहे.

“भारतातील नागरी सहकारी बँकेची ज्याप्रमाणे रिझर्व बँक ऑफ इंडिया ही शिखर बँक आहे,त्याप्रमाणे महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँक समजली जाते.त्यामुळे या ठेव संरक्षणाला अधिकृत दर्जा प्राप्त होणार आहे.तसेच सध्या ठेव संरक्षणाची रक्कम ही १ लाख रुपयांपर्यंत आहे.ही रक्कम टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,राज्य पतसंस्था फेडरेशन.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.अतुल सावे तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.भागवत कराड,मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यासह माजी अर्थ राज्यमंत्री आनंदराव आडसूळ,महाराष्ट्र राज्य सहकारी पत संस्था फेडरेशनचे संस्थापक वसंतराव शिंदे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व संस्थेचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य सहकारी पत संस्था फेडरेशनचे संचालक चंद्रकांत वंजारी तसेच संचालक लक्ष्मण पाटील व सर्जेराव शिंदे उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव व महासचिव डॉ.शांतीलाल सिंगी म्हणाले की,”महाराष्ट्रात सहकारी पतसंस्थांचे मोठे झाले आहे. तथापि सदर पतसंस्थांना बँकेचा बँकिंग परवाना नसल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या ठेवीदारांना संरक्षण मिळत नाही.त्यामुळे अनेक ठेवीदार पतसंस्थांकडे ठेवी ठेवण्याबाबत संभ्रमावस्थेत असतात.परंतु आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षणाची हमी दिल्याने पतसंस्थांची विश्वासाहर्यता वाढण्यास व पर्यायाने पतसंस्थांच्या ठेवींमध्ये वाढ होण्यास मदत होईल.

राज्य पतसंस्था फेडरेशनचे खजिनदार दादाराव तुपकर व उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव म्हणाले की,”गेली अनेक वर्षापासून राज्य पतसंस्था फेडरेशन करीत असलेली मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी मान्य केल्यामुळे आता पतसंस्थांची विश्वासाहर्ता देखील वाढीस लागेल.त्यामुळे पतसंस्थांनी देखील आता जबाबदारीने वागण्याची गरज आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक अजित देशमुख या योजनेबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की,”सहकारी पतसंस्थांनी आपल्या एक लाख रुपयापर्यंत ठेवींची एकूण रक्कम महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत गुंतवायची आहे या गुंतवणुकीवर सात टक्के इतका परतावा देखील देण्यात येईल त्यामुळे सहकारी पतसंस्थांचे कोणत्याही प्रकारे नुकसान न होता ठेवींना संरक्षण मिळणार आहे.

अ.नगर जिल्हा स्थैर्य निधी सहकारी संघाच्या वतीने गेली १० वर्षे ही योजना अहमदनगर जिल्ह्यात स्थैर्य निधी सहकारी संघ यशस्वीपणे राबवित आहे.याच धर्तीवर आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याने सहकारी पतसंस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे मत अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे व उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी व्यक्त केले आहे.

सदर प्रसंगी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी आभार व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close