जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अर्थकारण

तीन महिन्यात ५२ कोटी रुपयांची विक्रमी वाढ-…या पतसंस्थेचा विक्रम !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आर्थिक कामगिरी जाहीर करतांना ३० सप्टेंबर पर्यंत हे आर्थिक ताळेबंद जाहीर करणेचे बंधन राज्यातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांना आहे.परंतु समता नागरी सहकारी पतसंस्थेने आपले सर्व आर्थिक वर्षाचे ताळेबंद ३१ मार्च रोजीच जाहीर करणेची परपंरा गेली ३७ वर्षे राखलेली असून यापुढे जाऊन तर तिमाहीची आकडेवारी देखील समता पतसंस्था प्रत्येक तिमाही नंतर जाहीर करत या परंपरेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.३१ मार्च २०२३ नंतर केलेल्या तिमाही आर्थिक प्रगतीचा अहवाल समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी संचालक मंडळाचे वतीने ३० जुलै रोजीच प्रसिद्ध केला असल्याची माहिती दिली आहे.

समता पतसंस्थेची वैधानिक तरलतेची रक्कम २८८ कोटी इतकी असून सहकार खातेचे नियमाप्रमाणे वैधानिक तरलतेची टक्केवारी २५% राखणे बंधनकारक असतांना देखील समता नागरी सहकारी पतसंस्थेने ३४.१५% इतके प्रमाण राखून ठेवीदाराची सुरक्षितता जपली आहे.

या अहवालानुसार दि.३१ मार्च रोजी समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी ७९२ कोटी इतक्या होत्या.गत तीन महिन्यात या ठेवीमध्ये तब्बल ५२ कोटी इतक्या रुपयांची वाढ होऊन या ठेवी ८४४ कोटी रुपयांच्या झालेल्या आहेत.वार्षिक वाढीचे प्रमाण २६.३०% इतके पडले आहे.ही महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीतील विक्रमी ठेव वाढ ठरली असल्याचा दावा केला आहे.

कर्ज वाटपात देखील ही वाढ कायम राहीली असुन दि.३१ मार्च २०२३ रोजी ५५६ कोटी ५५ लाख इतके कर्ज वाटप होते. त्यात देखील २८ कोटी ४५ लाख इतक्या रुपयाची वाढ होऊन हे कर्ज वाटप ५८५ कोटी रुपये इतके झाले आहे. वार्षिक कर्ज वाढीचा वेग २०% इतके टक्के आहे.

या कर्ज वाटपापैकी जगभरात सर्वात सुरक्षित समजले जाणा-या केवळ सोनेतारणाच्या सिक्युरिटीवर दिलेले कर्ज २६५ कोटी इतके असून सोने तारण कर्जाचे एकूण तारणी कर्जाशी प्रमाण ४५.२९% इतके आहे.वरील आर्थिक परिस्थितीचा विचार करता वैधानिक तरलतेची गुंतवणूक व जगभरात सर्वात सुरक्षित समजले जाणारे सोने तारण कर्जाचे वाटप तसेच मुदत ठेवीचे तारणावर दिलेल्या कर्जाचे वाटप व संस्थेची कायम मालमत्ता १३ कोटी ६८ लाख रुपयांची झाली आहे.वरील सर्व भर भक्कम अशा आर्थिक परिस्थितीमुळे समता लिक्वीडीटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम अंतर्गत ९९.७१ टक्के इतके ठेवीदारांच्या २७ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या रु.२ हजार नोटबंदी नंतर तसेच बँकींग व संस्था चळवळीतील संभ्रमावस्थेत देखील समता पतसंस्थेने मारलेली ही भरारी समता पतसंस्थेचे मार्गदर्शक ओमप्रकाश कोयटे यांचेवरील व सर्व संचालक मंडळावरील विश्वासाचे प्रतिक असलेचे संस्थेचे संचालक कोयटे यांनी सांगितले आहे.

या उपक्रमाचे संस्थेचे जेष्ठ संचालक जितुभाई शहा,गुलाबशेठ अग्रवाल,अरविंद पटेल,चांगदेव शिरोडे,रामचंद्र बागरेचा, कांतीलाल जोशी,गुलशन होडे,निरव रावलीया,कचरू मोकळ तसेच महिला संचालिका श्वेताताई अजमेरे,शोभाताई दरक, आदींनी अभिनंदन केले आहे.त्यासाठी सरव्यवस्थापक सचिन भट्टड व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close