जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अभिष्टचिंतन कार्यक्रम

…या शहरात लायन्स-समता ब्लड बँकेची सुरुवात होणार !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   समता पत्सासंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात लवकरच लायन्स-समता ब्लड बँक सुरू होणार असल्याची घोषणा समता पतसंस्थेचे व लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे संचालक संदीप कोयटे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

  

  राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता पतसंस्थेचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त समता चॅरिटेबल ट्रस्ट,समता नागरी सहकारी पतसंस्था,समता इंटरनॅशनल स्कूल,लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव,व्यापारी महासंघ,तालुका किराणा मर्चंट असोसिएशन,सुधन गोल्ड लोन यांच्या संयुक्त विद्यमाने सक्तदानासह विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले आहे त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी समता पतसंस्थेचे संचालक निरव रावलिया,दिपक अग्रवाल,गिरीश सोनेकर,व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,खजिनदार तुलसीदास खुबानी,सचिव प्रदीप साखरे,गुलशन होडे,किरण शिरोडे,लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष अक्षय गिरमे,राजेश ठोळे,डॉ.अभिजीत आचार्य,धीरज कराचीवाला,हर्षल जोशी,समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर अत्तार,शिक्षक-शिक्षिका आदींसह लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव चे पदाधिकारी,सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

    सदर प्रसंगी या रक्तदान शिबिरात कोपरगाव शहरातील सेवानिवृत्त शिक्षक प्रवीण सुधाकर वाणी यांनी तब्बल १३१ वे रक्तदान केले.तर समता पतसंस्थेचे संचालक निरव रावलीयासह ९१ जणांनी सहभाग नोंदविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close