अपघात
महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,दोन एकर ऊस जळून खाक,कोपरगावातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस आठ कि.मी.अंतरावर असणाऱ्या दहिगाव बोलका शिवारात असणाऱ्या गट क्रमांक ८० व ८१ मध्ये काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास गळीतास असणाऱ्या दोन एकर क्षेत्रातील ऊसास महावितरण कंपनीच्या विद्युत तारांच्या संघर्षातून लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला असून यात सुमारे २.२५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.मात्र कोपरगाव नगरपरिषद व संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या अग्नीशामक बंबानी वेळेत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती तेथील शेतकरी दत्तात्रय डोखे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील लागलेल्या महावितरणच्या आगीत शेतकरी डोखे यांचे जवळपास एक एकर ऊस क्षेत्र जळून खाक झाले आहे.त्यात असलेली ठिबक योजना व शेततळ्याचा कागद आदी जवळपास ०२ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.त्याची नुकसान भरपाई महावितरण कंपनीने द्यावी अशी मागणी शेतकरी दत्तात्रय डोखे यांनी केली आहे.
ऊस लागून सुमारे २.२५ लाख नुकसानींस कारणीभूत ठरलेला हाच तो महावितरण कंपनीचा विद्युत पोल छायाचित्रात दिसत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या विद्युत वाहक तारांची उंची खूपच खाली असून त्याची वेळेवर देखभाल करणे गरजेचे आहे मात्र महावितरण कंपनीचे हे रडगाणे शेतकऱ्यांच्या मुळावर उठताना दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दि.०३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.त्या ठिकाणी असलेले शेतकरी दत्तात्रय डोखे यांच्या गट क्रमांक मधून अनेक विद्युत वाहक पोल व अनेक विद्युत वाहक तारा गेलेल्या आहेत.त्यासाठी वांरवार शेतकऱ्याने पाठपुरावा करून त्या शेतातून बाहेर काढलेल्या नाही.त्यामुळे जो अनर्थ व्हायचा तो काल सकाळी झाला असून त्यातून त्यातले त्यात शेतातून अकरा के.व्ही.विद्युत वाहिनी गेलेली आहे.त्यामुळे संजीवनी सहकारी साखर कारखान्यास गळीतास असलेला दोन एकर ऊस जाळून खाक झाला आहे.
सदर बाब शेतकऱ्यांच्या शेजारील शेतकऱ्यांने लक्षात आणुन दिली व त्यांनी संबंधित शेतकऱ्यास दूरध्वनीवरून सदर धक्कादायक बाब कळवली असता त्यांनी याबाबत आपत्कालीन विभागाचा दूरध्वनी क्रमांक ११२ फिरवून सदर विभागास हि बाब कळवली असता त्यांनी त्याची दखल घेतली आहे.
दरम्यान संबधीत शेतकऱ्याने हि घटना कोपरगाव नगरपरिषद व संजीवनी सहकारी साखर कारखाना यांच्या प्रशासनास कळवली होती.त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात आपली अग्नी प्रतिबंधात्मक यंत्रणा पाठवली त्यामुळे त्यांनी अवघ्या काही तासात सदर आग आटोक्यात आणली आहे.
दरम्यान या आगीत शेतकरी डोखे यांचा जवळपास एक एकर क्षेत्र ऊस जाळून खाक झाला आहे.त्यात असलेली ठिबक योजना व शेततळ्याचा कागद आदी जवळपास ०२ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान आज सकाळी दहिगाव बोलका येथील कामगार तलाठी,पोलीस पाटील,कृषी पर्यवेक्षक आदींनी पंचनामा केला असल्याची माहिती हाती आली आहे.या घटननेने आपदग्रस्त शेतकरी हादरून गेला असून त्यांनी या प्रकरणी महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.