अपघात
दुचाकींचा अपघात,दोन जखमी,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास पुणतांबा चौफुलीच्या पुढे कातकडे पेट्रोल पंपाचे समोर आरोपी विलास सागर माळवदे याने आपल्या ताब्यातील बजाज पल्सर (क्रं.एम.एच.१७ बी.जे.५७५५) हिने हिरो होंडा स्प्लेंडर क्रं.एम.एच.१५ बी.क्यु.५७५५) हिला जोराची धडक देऊन फिर्यादी इसम सागर बाळू पवार व त्याचा मेहुणा आकाश भाऊसाहेब सोनवणे दोघे रा.कारवाडी यांना गंभीर रित्या जखमी झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सागर बाळू पवार (वय-२८) व त्यांचा मेहुणा आकाश सोनवणे हे दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री ०९.४५ वाजेच्या सुमारास आपल्या वरील क्रमांकाच्या हिरो होंडा या दुचाकीवरून जात असताना बजाज पल्सर कम्पनीच्या वरील क्रंनाकाच्या दुचाकीवरील आरोपी विलास सखाराम माळवदे रा.धोत्रे ता.कोपरगाव याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष अविचाराने हयगईने भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील वाहन चालवून समोरून येणाऱ्या आमच्या हिरों होंडा या दुचाकीस मागील बाजूने जोराची धडक दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सागर बाळू पवार (वय-२८) व त्यांचा मेहुणा आकाश सोनवणे हे दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री ०९.४५ वाजेच्या सुमारास आपल्या वरील क्रमांकाच्या हिरो होंडा या दुचाकीवरून जात असताना बजाज पल्सर कम्पनीच्या वरील क्रंनाकाच्या दुचाकीवरील आरोपी विलास सखाराम माळवदे रा.धोत्रे ता.कोपरगाव याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष अविचाराने हयगईने भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील वाहन चालवून समोरून येणाऱ्या आमच्या हिरों होंडा या दुचाकीस मागील बाजूने जोराची धडक दिली आहे.आपण आपला मेहुणा आकाश सोनवणे याच्या दुखापतीस कारणीभूत झाला आहे.या प्रकरणी आपण आधी जवळच्या संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल व नंतर लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाल्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३२८/२०२१ भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.