जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

कारखान्यात अपघात,कर्मचाऱ्याचा मृत्यू ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगांव तालुक्यातील करंजी बुद्रुक येथील येथील गोदावरी कालव्या नजिक प्रभाग क्रं.चार मध्ये रहिवासी व संजीवनी सहकारी साखर कारखान्यात सेवेत असलेला कर्मचारी अविनाश अण्णासाहेब डोखे (वय-४५) याचे आज सकाळी १०.१५  वाजता आपल्या कर्तव्यावर असताना अपघात होऊन निधन झाले आहे.त्याच्या पश्चात आई,दोन भाऊ,पत्नी,एक बहीण,०३ मुली एक मुलगा असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी तातडीने धाव घेतली असल्याचे दिसून आले आहे.

मयत इसम हा स्वभावाने मनमिळावू म्हणून करंजी आणि परिसरात ओळखला जात होता.दरम्यान यापूर्वीही याच प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळीही एक तरुण विजेचा धक्का बसून निधन झाले होते अशी माहिती मिळाली आहे.ग्रामीण रुग्णालयात भ्रमणध्वनी नातलगांनी हिसकावून घेतले असल्याची ऐकीव माहिती हाती आली आहे.

   दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसली तरी करंजी बुद्रुक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तो सी.एन.जी.प्रकल्पाच्या टाकीत पडून मृत पावला असल्याचे बोलले जात आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला असून सदर मयत इसमाचे शव विच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नुकतेच दाखल केले असून त्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी पोलिस हजर झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   मयत इसम हा स्वभावाने मनमिळावू म्हणून करंजी आणि परिसरात ओळखला जात होता.दरम्यान यापूर्वीही महाविद्यालयीन प्रकल्पाच्या वेळीही एक तरुण विजेचा धक्का बसून निधन झाले होते अशी माहिती मिळाली आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

   दरम्यान कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात काही सोशल मिडियाचे पत्रकार सदर बातमी घेण्यासाठी गेले असता त्यांना काही इसमांनी दमदाटी करून त्यांचे भ्रमणध्वनी हिसकावून घेतले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.त्यामुळे याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close