अपघात
दोन वेगळ्या घटनात दोन महिलांचा मृत्यू!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज दोन विविध घटना दोन महिलांचे निधन झाले आहे.त्यात नाटेगाव येथील महिला अनुराधा दिपक मोरे (वय-२१) यां दुचाकीवरून पडून अपघात झाला आहे त्यात त्यांचे तर कान्हेगाव येथील महिला कविता बबन सुरभैय्या (वय -४९) यांचे घराच्या स्वयंपाक गृहात स्वयंपाक करताना गॅसची नळीद्वारे गळती झाल्याने त्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या.त्या दोघींवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघींचे अनुक्रमे १५ ऑगस्ट व १९ ऑगस्ट रोजी निधन झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आज अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान दुसऱ्या घटनेत कान्हेगाव येथील महिला कविता बबन सुरभैय्या यां आपल्या घरात स्वयंपाक करत असताना त्यांच्या गॅसची गळती झाली होती.त्यात त्यांना गंभीर इजा झाली होती. त्यांना त्यांच्या नातेवाईकानी उपचारार्थ लोणी येथील प्रवरा रूग्णालय येथे भरती केले होते.त्यात त्यांचे निधन झाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”पहिल्या घटनेत कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील महिला अनुराधा दिपक मोरे या आपल्या नातेवाईकाबरोबर दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला त्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यांना त्यांच्या नातेवाईकाने उपचारार्थ लोणी येथील प्रवरा रूग्णालय येथे भरती केले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचे लोणी येथे निधन झाले आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत कान्हेगाव येथील महिला कविता बबन सुरभैय्या यां आपल्या घरात स्वयंपाक करत असताना त्यांच्या गॅसची गळती झाली होती.त्यात त्यांना गंभीर इजा झाली होती. त्यांना त्यांच्या नातेवाईकानी उपचारार्थ लोणी येथील प्रवरा रूग्णालय येथे भरती केले होते.मात्र उपचारतसुरु असताना त्यांचे निधन झाले आहे. दोन्ही प्रकरणी लोणी येथील वैद्यकीय अधिकारी यांनी आधी लोणी येथील पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून तो कोपरगाव तालुक्यातील पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,सहाय्यक फौजदार आबासाहेब वाखूरे, हे.कॉ.संदीप बोटे आदींनी भेट देऊन धाव घेऊन स्थळपंचनामा केला होता.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात गुन्हा अनुक्रमे नोंद ५६,५७ /२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम १९४ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.संदीप बोटे, निजाम शेख आदी अधिकारी करीत आहेत.