अपघात
मोटार अपघातात पोलीस कर्मचारी जखमी,अद्याप गुन्हा नाही

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारातील शिर्डी – सिन्नर रस्त्यावर आज सकाळी 09 वाजेच्या सुमारास झालेल्या दुचाकी (क्रमांक एम.एच.17 बी.पी.9016) आणि एक मारुती अल्टो यांच्यात अपघातात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर (वय-33) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा डावा पाय मांडीत मोडला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या प्रकरणी त्यांना कोपरगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.

शिर्डी – सिन्नर हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग झाला असून यावर वर्तमानात वाहने भरधाव वेगाने धावत असताना दिसून येत आहे.त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेलं असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना आज सकाळी 09 वाजता घारी शिवारात घडली असून यात पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सुपेकर हे गंभीर जखमी झाले आहे.या अपघातात त्यांचा डावा पाय मांडीत मोडला असून त्यांच्यावर कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या प्रकरणी अद्याप कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला नाही.दरम्यान मारुती अल्टो ही गाडी अद्याप घटनास्थळीच असून त्याच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कूसारे हे करीत आहेत.