जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
स्पर्धा

कोपरगाव शहरात,’जम्प रोप स्पर्धा’ हा कोपरगावचा गौरव-कौतुक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

ग्रामीण भागात दोरीवर उड्या मारणे हे सर्वांना माहीत आहे,पण राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर या स्पर्धांचे आयोजन करून भारतीय स्पर्धक देशाचे प्रतिनिधित्व करत असतात ही स्पर्धा कोपरगाव तालुक्यात आयोजित करून आम्हा कोपरगावकरांचा सन्मान केला असल्याचे गौरवोद्गार राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी काढले आहे.

“आपण २००८ पासून जम्प रोप या क्रिडा प्रकाराशी संबंधित आहे.अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धा एखाद्या सुशोभित मोठ्या शहरामध्ये घेतल्यासारखे वाटल्याचे सांगून आयोजकांचे कौतुक केले आहे”-बिरसिंग आर्या,सरचिटणीस,हरियाणा जम्प रोप असोशिएशन.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय जम्प रोप महासंघ,महाराष्ट्र राज्य जम्प रोप असोसिएशन,अ.नगर जिल्हा जम्प रोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रवारी दरम्यान राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आणि महानंदा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,समता स्कूलचे उपप्राचार्य समीर आत्तार,भारतीय जम्प रोप महासंघाचे अध्यक्ष तौसिफ लारी गट शिक्षणाधिकारी शबाना शेख,भारतीय जम्प रोप महासंघाचे सचिव शाजाद खान,महाराष्ट्र जम्प रोप असो.चे मार्गदर्शक अशोक दुधारे,सचिव दिपक निकम,कार्याध्यक्ष पांडुरंग रणमाळ,संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र झावरे,रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त आकाश नागरे,एस.एस.जी.एम.कॉलेजचे एल.एम.सी.मेंबर संदीप वर्पे,सुनील गंगुले,आकाश झावरे,शिव छञपती पुरस्कार विजेते शेषनारायण लोढे,दिलीप घोडके,समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे अध्यक्ष संदीप कोयटे,पदाधिकारी,सदस्य,स्पर्धक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

सदर प्रसंगी अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे कार्याध्यक्ष दिलीप घोडके म्हणाले की,”जम्प रोप या क्रिडा प्रकाराची ओळख नव्याने कोपरगावकरांना व्हावी,कोपरगाव तालुक्यातील खेळाडूंनी देखील या क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करावे या उद्देशाने विद्यार्थी केंद्रित समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याचे निश्चित झाले असल्याचे माहिती दिली आहे.

हरियाणा जम्प रोप असो.चे सेक्रेटरी बिरसिंग आर्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,”आपण २००८ पासून जम्प रोप या क्रिडा प्रकाराशी संबंधित आहे.अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धा एखाद्या सुशोभित मोठ्या शहरामध्ये घेतल्यासारखे वाटल्याचे प्रतिपादन केले असून त्यांचे कौतुक केले आहे.

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, भारतीय जम्प रोप महासंघाचे अध्यक्ष तौसिफ लारी गट शिक्षणाधिकारी शबाना शेख,भारतीय जम्प रोप महासंघाचे सचिव शाजाद खान,महाराष्ट्र जम्प रोप असो.चे मार्गदर्शक अशोक दुधारे,सचिव दिपक निकम,कार्याध्यक्ष पांडुरंग रणमाळ,संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र झावरे,रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त आकाश नागरे, एस.एस.जी.एम.कॉलेजचे एल.एम.सी.मेंबर संदीप वर्पे,सुनील गंगुले,आकाश झावरे,शिव छञपती पुरस्कार विजेते शेषनारायण लोढे,दिलीप घोडके,समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे,अ.नगर जिल्हा जम्प रोप असो.चे अध्यक्ष संदीप कोयटे,पदाधिकारी,सदस्य,स्पर्धक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनचे पदाधिकारी,चंद्रकांत शेजुळ,बाबासाहेब गवारे,नितीन निकम,निवृत्ती मुरडणर,रोहित महाले,कार्तिक मोरे,राहुल रुईकर,सार्थक बडजाते,आर्यन घोडके,श्लोक कोताडे,मल्हार देवकर,अखिलेश ठोंबरे,अर्णव वाबळे,तन्मय साबळे,दिपक जायभाये,समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मानले आहे तर उपस्थितांचे आभार शिवप्रसाद घोडके यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close