जाहिरात-9423439946
दळणवळण

सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम मुदतीत दर्जेदार करा-आ.काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

गेली काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम केंद्रीय रास्ते विकास निधीतून सुरु असून त्या कामावर नुकतीच कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी भेट दिली आहे. व सदर कामास गती देण्याची सूचना केली असल्याचे वृत्त त्यांच्या प्रसिद्धी विभागाने दिली आहे.

शिर्डी-इंदोर या मार्गावर अपघातांची संख्या वाढली होती.या मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु असतांना अ.नगर-मनमाड मार्ग सावळीविहिरपासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटा,कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात येवून सिन्नर,शिर्डी,अ.नगर,दौंड,बारामती,पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग १६० मंजूर करण्यात आला आहे.

आ.काळे यांनी सोमवार दि.०६ फेब्रुवारी रोजी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत एन.एच.७५२ जी.या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरु असलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याच्या कामाची पाहणी केली.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी सावळीविहीर ते कोपरगाव तालुक्याच्या हद्दीततील येवला नाका पर्यंत सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला आहे.

त्या वेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,शंकरराव चव्हाण,राहुल रोहमारे,प्रविण शिंदे,शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष देवेन रोहमारे, केशव जावळे,गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते,रोहिदास होन,दिपक रोहोम,अजय रक्ताटे,सुनील लोहकणे, विजय थोरात,शामराव लोहकणे,परसराम रक्ताटे,भाऊसाहेब माळशिखरे,सुनील कुहिले,संतोष लोंढे,सोपान काशीद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी बडगुजर,पंचायत समितीचे गणेश गुंजाळ,ग्रामसेवक संग्राम बोर्डे,एस.ए.यादव कन्स्ट्रक्शनचे महा व्यवस्थापक अनिल बर्गे,प्रकल्प व्यवस्थापक अभिषेक मेनन,अभियंता दिपक यादव,अजय यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी ते म्हणाले की,”सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या मार्गावर लहान-मोठी अनेक खड्डे पडून रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढली होती.या मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु असतांना अ.नगर-मनमाड मार्ग सावळीविहिरपासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटा,कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात येवून सिन्नर,शिर्डी,अ.नगर,दौंड,बारामती,पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग १६० मंजूर करण्यात आल्यामुळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे भविष्य टांगणीला लागले होते.या रस्त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केद्रीय रस्ते मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या सहकार्याने तब्बल १९१ कोटी निधी मिळविण्यात यश मिळून आज या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close