साहित्य व संस्कृती
सभोवतालच्या घटनांनी संवेदनशील मन व्याकुळ होते-पाटील

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माणूस संवेदनशील मनाचा प्राणी आहे.आपल्या सभोवताली घडणाऱ्या दुर्घटना पाहून आपण कधी व्याकुळ होतो आणि मग ती घटना आपल्या कौशल्याने जनमानसात नेण्यासाठी शब्दात मांडून कथा,कविता,कादंबरी,लेख या माध्यमातून पुस्तक रूपाने प्रसिध्द करतो, तेव्हा साहित्यिक निर्माण होतो असे प्रातिपादन जेष्ठ साहित्यिक राजर्षी शाहू महाराज जेष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष मंसाराम पाटील यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
बँकेचे शाखा व्यवस्थापक अनुराधा रणदिवे यांनी वाचकांच्या मनातील भावना व्यक्त केल्या पुस्तक दिनाच्या निमित्ताने जेष्ठ साहित्यिक डॉ.दादासाहेब गलांडे लिखीत ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
कोपरगाव येथील श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या वतीने पुस्तक दिनाचा समारंभाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी सेवा निवृत्त शिक्षिका जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या रजनीताई गुजराथी,शैलजा रोहोम,छायाचित्रकार हेमचंद्र भवर,शब्द गंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेचे अध्यक्ष कवी कैलास साळगट साहित्यिक कलावंत दत्तात्रय विरकर,कवी प्रमोद येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा पैठणकर यांनी केले.तर अनुराधा रणदिवे ( खरात) यांनी सोसायटीच्या कार्याचा आढावा घेतला आहे. पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी पुस्तक निर्माण प्रक्रिया लेखक वाचक संबंध याविषयी विचार व्यक्त केले आहे.
यावेळी शैलजा रोहोम,रजनीताई गुजराथी,कैलास साळगट यांनी आपले ग्रंथ वाचकांना भेट दिले समारंभासाठी पवन अग्रवाल प्रल्हाद वाघ यांनी परीश्रम घेतले आहे. लेखक वाचक उपस्थित होते.उपस्थितांचे आभार हेमचंद्र भवर यांनी मानले आहे.