सहकार
केंद्र सरकारने २५-३० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी परवानगी द्यावी-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ४ हजाराच्या पुढे असून त्याचा लाभ उठविण्यासाठी केंद्र सरकारने २५-३० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी परवानगी महत्त्वपूर्ण मागणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखाण्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी गौतमनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील सहकारात अग्रणी असलेला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन-२०२२-२३ चा ६८ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरणारे व अलका बोरणारे यांच्या हस्ते नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.अशोक काळे हे होते.

“आगामी हंगामात कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण होऊन प्रतिदिन ते ०६ हजार ५०० टनावर पोहचेल असा अंदाज व्यक्त करून त्यातून आगामी ऊस गळीत हंगाम साधारण १००-१२० दिवस चालेल त्यातून उसाचे गाळप लवकर करण्यास मदत होणार आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखाना,गौतमनगर.
सदर प्रसंगी माजी उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे,
सुधाकर रोहोम,संचालक सचिन चांदगुडे,शंकरराव चव्हाण,श्रीराम राजेभोसले,प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,माजी संचालक अरुण चंद्र,श्रावण आसने,सूर्यभान कोळपे,सुधाकर रोहोम,दिनार कुदळे,प्रवीण शिंदे,राहुल रोहमारे, राजेंद्र घुमरे,सुरेश जाधव,पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल कदम,ज्ञानदेव मांजरे,अशोक मवाळ,मनोज जगझाप,सुनील मांजरे,विष्णू शिंदे आदी मान्यवरांसह बहुसंख्य सभासद,शेतकरी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”गत हंगामात केंद्र सरकारने एफ.आर.पी.पेक्षा जास्त दर दणाऱ्या कारखान्याना केंद्र सरकारच्या आयकर विभागाने जास्तीची कर आकारणी केली होती.त्यामुळे राज्यातील सहकारी कारखान्याना ०९ हजार ५०० कोटींचा भुर्दंड बसला होता त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात साखर संघाने अपील करून तो कर माफ करून घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”कारखान्याने आधुनिकीकरण केले असून काही काम बाकी आहे आगामी हंगामात प्रतिदिन सुमारे ६.५ लाख टन क्षमतेने ऊस गाळप होणार असून ऊस कमी पडण्याची शक्यता आहे.त्यासाठी सभासद आणि संचालक आदींना आपल्या पाहुण्यांना उसासाठी गळ घालावी लागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,कर्मवीर काळे साखर कारखान्याचा हंगाम १३३ दिवस चालला त्या गळीत हंगामात
५ लाख २४ हजार ९४८ मे.टन ऊस गाळप करण्यात आला आहे.त्यातून ०६ लाख ७ हजार ४०० क्विंटल साखर पोती निर्माण होऊन त्याचा सरासरी
उतारा ११.५७ ठेवण्यात कारखाना प्रशासनास यश मिळाले आहे.कारखान्याचे नूतनीकरण सुरु असल्याने प्रारंभी गळीतस जवळपास १२-१३ दिवस उशीर झाला त्यामुळे आधीचा सुमारे २७ हजार ९६१ टन ऊस लोणी येथील पद्मश्री विखे पाटील,व भाऊसाहेब थोरात कारखान्यास कराराने द्यावा लागला आहे.राज्यातील साखर कारखान्यांनी जवळपास २१० लाख टन उसाचे गाळप केले आहे.संपलेल्या गळीत हंगामात साधारण १३७ लाख टन ऊस गाळप होईल असा अंदाज असताना जास्तीच्या पर्जन्यमानाने त्यास घट होऊन १०८ लाख टन झाले आहे.ते सरासरीपेक्षा २०-२५ टक्के कमी झाले आहे.गतवर्षी हेक्टरी ऊस उत्पादन ८१ टन होते ते यावर्षी सरासरी हेक्टरी ६५ टनांपर्यंत घसरले असल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे.त्यामुळे चालू हंगाम मार्च पर्यंत संपला आहे.गत वर्षी गाळप जून पर्यंत चालले असल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे.
आगामी हंगामात कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण होऊन प्रतिदिन ते ०६ हजार ५०० टनावर पोहचेल असा अंदाज व्यक्त केला आहे.त्यातून आगामी हंगाम साधारण १००-१२० दिवस चालेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
कारखान्याच्या शेतकी विभागाने नवीन संशोधित ऊस वाणाचा पुरस्कार करून शेतकऱ्यांना तो लावण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. व कारखाना संगणकीय झाला असल्याने कारखान्यात आता जास्त अधिकारी व कर्मचारी दिसणार नाही त्या ऐवजी ते नियंत्रण कक्षातून सर्व कारखाना नियंत्रित करतील असा आशावाद व्यक्त केला आहे.मात्र वातानुकूलित यंत्रणेचा अधिकारी व कामगार यांनी निवांत झोपण्यासाठी वापर करू नये अशी कोपरखीळी त्यांनी शेवटी मारली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले आहे तर सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार संचालक डॉ.मच्छीन्द्र बर्डे यांनी मानले आहे.