सहकार
अडचणीत सापडलेल्या सहकारी दूध संघांना संरक्षण द्या-..यांची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अडचणीच्या काळात नफा-तोट्याचा विचार न करता शासनापेक्षा अधिकचा दर देऊन दूध उत्पादकांना आधार देणाऱ्या सहकारी दूध संघांच्या पाठिशी उभे राहून संरक्षण देण्याचे धोरण शासनाने स्वीकारावे अशी मागणी गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
“सहकारातील बड्या नेत्यांनी राज्यातले साखर कारखानेच मोठे करण्याचे धोरण राबवून सहकारी दूध संघाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले.या सापत्न वागणुकीमुळे आज राज्यातले अनेक दूध संघ अडचणीत आले आहेत.अशाही परिस्थितीत गोदावरी दूध संघाने दूध उत्पादकांचे हीत समोर ठेऊन शासनापेक्षा तीन ते चार रुपये अधिक दर दिला आहे”-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी-परजणे सहकारी दूध संघ.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात पार पडली आहे.यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सदर प्रसंगी सभेला संघाचे संचालक राजेंद्रजाधव,विवेक परजणे,उत्तमराव माने,निवृत्ती नवले, यशवंत गव्हाणे,भाऊसाहेब कदम,सदाशिव कार्ले,दिलीप तिरमखे,सुनंदाताई होन,कुंदाताई डांगे यांच्यासह संघाचे सभासद,दूध संस्थांचे प्रतिनिधी,दूध उत्पादक शेतकरी,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.ज्येष्ठ कार्यकर्ते आंबादास वराडे यांनी आभार व्यक्त केले आहे.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”सहकारातील बड्या नेत्यांनी राज्यातले साखर कारखानेच मोठे करण्याचे धोरण राबवून सहकारी दूध संघाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले.या सापत्न वागणुकीमुळे आज राज्यातले अनेक दूध संघ अडचणीत आले आहेत.अशाही परिस्थितीत गोदावरी दूध संघाने दूध उत्पादकांचे हीत समोर ठेऊन शासनापेक्षा तीन ते चार रुपये अधिक दर दिला.यातून संघाला कोट्यावधीचा तोटा सहन करावा लागला.अनेक चढ उतार येऊनही संघाने आपली वाटचाल सुरूच ठेवली असल्याचे सांगितले आहे.
परजणे पुढे म्हणाले,”गोदावरी दूध संघाने अहवाल सालामध्ये एकूण ५ कोटी ९१ लाख २६ हजार ११८ लिटर्स दुधाचे संकलन केलेले असून वार्षिक उलाढाल २२९ कोटी ६८ लाख ९७ हजार इतकी झालेली आहे.शेतकऱ्यांना दूध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी संघाने अमेरिकेतून आयात केलेल्या अत्याधुनिक सॉर्टेड सिमेनची ऑक्टोंबर २०१६ पासून कार्यक्षेत्रात सुरुवात केली.या सॉर्टेड सिमेनमुळे जन्माला येणाऱ्या कालवडींची संख्या ९२ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.जन्मलेल्या कालवडींपैकी अनेक कालवडी व्यायल्या असून त्यांची दूध देण्याची दैनंदिन क्षमता सुमारे २६ ते २७ लिटर्स इतकी आहे.दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेल्या गायींसाठी १,०५० रुपये किंमतीचे सॉर्टेड सिमेन सवलतीच्या दराने म्हणजेच १५० ते २०० रुपये प्रमाणे तीन महिन्याकरिता उपलब्ध करुन दिलेले होते. त्यासोबत २४ लाख ०५ हजार ६०० रुपयाचे मिनरल मिक्चर मोफत देण्यात आलेले आहे. या उपक्रमाचा दूध उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. हा उपक्रम राबविताना संघ व बायफ संस्थेने १ कोटी ५७ लाख ८६ हजार ७५० इतका आर्थिक भार सोसलेला आहे. कोपरगांव तालुक्यासह राहाता,वैजापूर,येवला,सिन्नर या तालुक्यातही दूध उत्पादन वाढीसाठी ४० केंद्रांमार्फत कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम राबविला जात आहे.त्याकरिता संघ वर्षाकाठी सव्वा कोटीपर्यंत खर्च करीत आहे.संघाच्या कार्यस्थळावरील पशुरोग निदान प्रयोगशाळेत सन २०१८ पासून जनावरांच्या विविध आजारांवर निदान व उपचार सुरु आहेत. बहुतांशी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांचे रक्त,मलमूत्राचे १,१८७ नमुने तपासणासाठी दिलेले असून उपचाराचा लाभ घेतलेला आहे.तसेच गोदावरी पशुसंवादिनी या उपक्रमाच्या माध्यमातून ४,६५२ पशुपालकांना गोठ्याची रचना,जनावरांची घ्यावयाची काळजी, जनावरांना दिले जाणारे खाद्य, जंत निमलून, लसीकरण,स्वच्छ दूध उत्पादन याबाबत माहिती देवून मार्गदर्शन केलेले आहे.
सदर प्रसंगी संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय सविस्तर चर्चेने सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहेत.