जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ग्रामपंचायत जमिनीला फुटले पाय,कोपरगावात आंदोलन !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मौजे संवत्सर येथील ग्रामपंचायत मालकीचे क्षेत्र ३.९४ हे आर.जमीन ही बेकायदेशीर शासनाची परवानगी न घेता शृंगेश्वर महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला हस्तांतरीत झाली असल्याचे माहिती संजय काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत मात्र गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी मात्र उलट अहवाल दिला आहे.त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणात गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी खोटा अहवाल केला आहे.कंपनी अस्तित्वात नसताना हि जमिनीचा भाडेपट्टा व करार संवत्सर ग्रामपंचायतीने केला कसा ? असा सवाल करून त्यांनी तशा तारखा दिल्या असून हा सदर जमीन लाटण्याचा प्रकार असल्याचा आरोप करुन आपण या गैरप्रकारा विरुद्ध लढा देणार आहे”-संजय काळे,सामाजिक कार्यकर्ते.

सदरच्या राज्य महामार्ग लगत असलेल्या कोट्यावधी च्या मालमत्तेचे माहिती अधिकारात प्राप्त कागदपत्र पुरावे सादर करुन गटविकास अधिकारी यांना चौकशीची मागणी केली आहे.आपल्या तक्रारी वर काय कारवाई केली यासाठी माहिती अधिकार अर्ज टाकला,महिना उलटून गेल्या नंतर माहिती अधिकार अपिल दाखल केले.त्यास देखील मोठा कालावधी उलटून गेला असल्यानी संताप व्यक्त करून आज आंदोलन केले आहे.

दरम्यान यात गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी,”सदर जमीन संवत्सर ग्रापंचायतीने ठराव करून आधी अकरा महिन्याचा करार करून दिली होती.व त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे मंजुरीसाठी अहवाल पाठवला होता.त्यांनी त्यास पाच वर्षाचा भाडेपट्टीने मंजुरी दिली आहे सदर जागेचा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे व उपसरपंच विवेक परजणे यांनी दुरुपयोग केलेला नाही असे आपल्या अहवालात म्हटले आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याने देखील या प्रकरणात गटविकास अधिकारी यांना अहवाल मागितला होता मात्र पोलिसांना तो अहवाल अद्याप देखील दिला नाही.या संवत्सर गावचे जमीन गैरव्यवहारात त्यांचा देखील सहभाग असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आज शुक्रवार दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते एक वाजेपर्यंत गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव यांचे दालनाचे बाहेर काळा झेंडा घेऊन उभा राहून सत्याग्रह केला आहे.शांततापूर्ण मार्गाने आपण एकट्यानेच सत्याग्रह केला असल्याचे संजय काळे यांनी शेवटी म्हटले आहे.त्यामुळे आता प्रशासन काय करवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close