जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

गायकर याचे पद रद्द करण्याबाबत चौकशी-नाशिकच्या सह निबंधकाचा आदेश !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ.नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सिताराम कोंडाजी गायकर यांचे सहकार कायद्याची पायमल्ली करून मिळवलेलं पद रद्द करण्यासंदर्भात अर्जाची खातरजमा झालेमुळे चौकशीचे आदेश नाशिक येथील विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था यांनी दिले आहेत.त्यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

“जिल्हा बँक पातळीवर सेवा सोसायटी कर्ज थकबाकीत असताना संचालक मंडळ जिल्हा बँक निवडणूक साठी सदर सोसायटीच्या संचालक मंडळास मतदान अथवा निवडणूक लढविण्याचा अधिकार नाकारला आहे.या नियमाने सिताराम कोंडाजी गायकर हे सन-२०१४ ते २०२१ या कालावधीत मोग्रस विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक होते.मोग्रस वि.का.सेवा सोसायटी सन- २०१८-१९ ते २०१९-२० मध्ये बँक पातळीवर थकबाकीत होती.यामुळे सन २०२०-२५ सालासाठी सिताराम गायकर हे निवडणुक लढविण्यास अपात्र होते”-विभागीय सहनिबंधक.

वाल्मिक विठ्ठल नवले तांभोळ यांनी दिलेले तक्रारी अर्जावरून गौतम बालसाने यांनी जा. क्र. वि.नी./का वि- 937/अ.नगर जिमस/ नवले/ तअ/ ५२२०/ २०२०दि. ४/८/२०२० च्या पत्रानुसार अर्जदार यांच्या अर्जाची खातरजमा झालेमुळे जिल्हा उपनिबंधक यांना चौकशी अधिकारी नेमून चौकशी सुरू केली आहे.
वाल्मिक नवले यांनी दिलेले तक्रार अर्जात म्हटले आहे की,”अ.नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सिताराम कोंडाजी गायकर यांनी सहकार कायद्याचे उल्लंघन करून हे पद मिळविले आहे.त्यांचे हे पद रद्द करण्यात यावे.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २७ (१०) संलग्न कलम ७३-सीए (१) (आय) नुसार बँकेचे सदस्य असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी जर थकबाकीत असतील तर अशा संस्थेच्या संचालका ऐवजी सदर संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखादया सदस्याचा प्रतिनीधी म्हणून समावेश करण्याचा ठराव घेता येईल.जिल्हा बँक पातळीवर सेवा सोसायटी कर्ज थकबाकीत असताना संचालक मंडळ जिल्हा बँक निवडणूक साठी सदर सोसायटीच्या संचालक मंडळास मतदान अथवा निवडणूक लढविण्याचा अधिकार नाकारला आहे.या नियमाने सिताराम कोंडाजी गायकर हे सन-२०१४ ते २०२१ या कालावधीत मोग्रस विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक होते.मोग्रस वि.का.सेवा सोसायटी सन- २०१८-१९ ते २०१९-२० मध्ये बँक पातळीवर थकबाकीत होती.यामुळे सन २०२०-२५ सालासाठी सिताराम गायकर हे निवडणुक लढविण्यास अपात्र होते.सहकार कायद्याची पायमल्ली करून सोसायटीच्या संचालक पदाचा खोटा राजीनामा देण्याचा फार्स केला आहे. सन-२०२१-२२ सालाचे वार्षिक अहवाल मध्ये ते संचालक आहेत.त्यामुळे ते या पदासाठी अपात्र आहेच.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क.अ. (१) (अ) नुसार थकबाकीदार संस्थेच्या सभासदास संचालक पदावर राहाता येत नाही तसेच सहकार अधिनियम ७३ क अ च्या पोटकलम ३ अन्वये सदर संचालक पुढील पाच वर्षे संचालक होण्यास अपात्र होतात.सिताराम गायकर हे सन-२०१४-२०१० या सालात जिल्हा बँकेचे संचालक व चेअरमन होते.त्याच कालवधीत जिल्हा बँकेची सभासद मोगस सोसायटी ही सन-२०१८-१९ व २०१९ २० या कालावधीत बैंक पातळीवर थकवाकीत असल्याने तिचे ठराव प्रतिनीधी सिताराम गायकर हे संचालक पदावर राहण्यास अपात्र होते.२०२०-२५ या सालासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र होते.

महाराष्ट्र सहकार संस्थेच्या अधिनियम-१९६० नुसार व सहकार कायदा घटना दुरूस्ती ९७ नुसार कर्जदार सभासदास कर्जदार मतदार संघातून निवडणूक लढविता येते.सिताराम गायकर हे अ.नगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक-२०२०-२५ सालासाठी उंचखडक खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ठरावानुसार मतदानास अथवा उमेदवारी करण्यास पात्र ठरलेले आहे.मात्र उंचखडक खुर्द सोसायटीचे कर्जदार सभासद नाहीत.सोसायटीचे सभासद शेअर्स रक्कम १०० रु इतकी आहे.सिताराम गायकर हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २७ (१०) व संलग्न कलम ७३-सीए (१) (i) नुसार संस्थेचा क्रियाशिल सभासद ठरावास पात्र आहे.तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-१९६० चे कलम २६ (२) मधील तरतूदीनुसार सिताराम गायकर हे अक्रियाशिल सभासद असल्याने ते ठरावास अपात्र आहेत.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम क २२/२ नुसार व ९७ व्या घटना दुरूस्ती कलम ६ (९) नुसार सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सारख्या संस्थेचे सभासद मुख्य संस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा दिल्याशिवाय सभासदत्व धारण करता येत नाही.गायकर हे मोग्रस सोसायटीचे सभासद असतानाही उंचखडक खुर्द सोसायटीचे सभासद झालेले आहेत.हे सहकार कायद्याचे उल्लंघन आहे.अतिशय धक्कादायक बाब म्हणजे मोग्रस सोसायटीचे संचालक असणारे गायकर कर्ज आता उंचखडक सोसायटीचे कर्जदार झाले आहेत.कारभार ऐका संस्थांचा अन व्यवहार दुसरीकडे हे सुद्धा स्वयंघोषित सहकारमहर्षी नच्या नियमात बसते का ?

सिताराम गायकर यांनी अ.नगर जिल्हा बँक निवडणूक अर्जात वरील सर्व माहिती दिली नाही नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवाराने सादर करावयाचे प्रतिज्ञापत्र सहकारी संस्था निवडणुका नियम- २०१४ नियम २१ (४) नुसार खोटी माहिती दिली आहे.खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने त्यांचे संचालकपद रद्द करण्यात यावे.सिताराम गायकर हे सहकारातील अतिशय अभ्यासू व मुरब्बी व्यक्तिमत्व आहे त्यांनी आतापर्यंत सहकारी सोसायटी,दुध संघ,अगस्ती सहकारी साखर कारखाना, खरेदी विक्री संघ,देखरेख संघ,जिल्हा सहकारी बँक,महानंदा सहकारी दुध संघ अशा अनेक सहकारातील निवडणूका लढविल्या आहेत.यावरील सर्व संस्थाचे ते संचालक,व्हा.चेअरमन, चेअरमन या पदावर काम केलेले आहे त्यांनी थकबाकीदार असलेल्या मोग्रस सोसायटी ऐवजी उंचखडक खुर्द सोसायटीचा ठराव करून जिल्हा बँकेची निवडणूक लढविली आपल्या राजकीय बळाचा वापर करून अक्रियाशिल सभासद असलेल्या उंचखडक खुर्द सोसायटीचा ठराव करून जिल्हा बँकेची निवडणुक त्यांनी लढविली त्यामुळे या सर्व वरील बाबी विचारात घेता सिताराम गायकर यांचे संचालक पद रद्द ठरविण्यात यावे तसेच त्यांना सहकार कायद्याचे ज्ञान असल्याने त्यांनी जाणीवपुर्वक सहकार कायद्याच्या नियमांची पायमल्ली केली आहे.

त्यामुळे ते ज्या सहकारी संस्थाच्या पदावर कार्यरत असतील ते सर्व पदे कार्य मुक्त करावी.सहकार निवडणुकांसाठी अपात्र ठरविण्यात यावे.जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरती मध्ये अनेक नातेवाईक अगस्ती कारखान्याचे संचालक यांचे नातेवाईक यांची बोगस भरती केली आहे.अनेक उमेदवार पात्र असतानाही पैसे घेऊन भरती केली आहे त्याची पण निपक्ष पध्दतीने चौकशी व्हावी अशी मागणी वाल्मिक नवले यांनी शेवटी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close