जाहिरात-9423439946
सहकार

सहकारी पतसंस्था बळकटीकरणासाठी सहकार विभाग सकारात्मक निर्णय घेईल-आयुक्त

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था बळकटीकरणासाठी महाराष्ट्र शासन सहकार विभागाच्या वतीने जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर कार्यशाळा घेऊन पतसंस्था चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे.या बळकटीकरणाच्या मोहिमेमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनशी विचार-विनिमय करून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार खात्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले आहे.

“पतसंस्था चळवळ जिल्हा,तालुक्याबरोबरच ग्रामीण भागात ही पोहचली आहे.चळवळीतील पतसंस्थांना सहकार व्यवस्थेचे नियम व कायद्यांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन विभागीय कार्यशाळा घेऊन सविस्तर देत असते यातून पतसंस्था चळवळ बळकट होण्यास अधिक मदत होते त्यामुळे महाराष्ट्रातील पतसंस्थांसाठी कार्यशाळांचे आयोजन करीत असतो”-ओमप्रकाश कोयटे,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन.

नगर जिल्हा उपनिबंधक कार्यालय,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व नगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधी संघ यांच्या वतीने शिर्डी येथे महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० चे कलम १४४ व नियामक मंडळ या विषयावर आयोजित कार्यशाळे प्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी सहकारी पतसंस्थांच्या वतीने मांडलेल्या विविध विषयांवर बोलताना सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणाले की,”महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना नाममात्र सभासदांच्या ठेवी स्वीकारण्यासाठी नाममात्र सभासदांचा वेगळा मतदार संघ तयार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल तसेच बँकांना ज्याप्रमाणे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला आपली थकीत कर्जे विकता येतात,त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने ॲसेट रिकन्स्ट्रक्शन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रस्ताव तयार करून सहकार खात्याकडे सादर करावा.त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.तसेच बँकांना लागू असलेल्या सिबिल रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचा समावेश होण्यासाठी उच्च स्तरावर सहकार खात्याची बोलणी चालू आहेत, ही बोलणी प्रगती पथावर आहेत.सिबील मध्ये पतसंस्थांचा समावेश झाल्यास पतसंस्थांचा एन.पी.ए.कमी होण्यास मदत होईल.

कार्यशाळेचे उद्घाटन नगर जिल्ह्याचे उपनिबंधक श्री गणेश पुरी यांच्या हस्ते व नाशिक विभागाच्या विभागीय सहनिबंधक डॉ.ज्योती लाटकर,नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे सहाय्यक निबंधक,नगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे,उपाध्यक्ष वसंत लोढा,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे महासचिव डॉ. शांतीलाल शिंगी,उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव,संचालक लक्ष्मण पाटील,सुरेश पाटील, चंद्रकांत वंजारी,गोविंद अगरवाल,संचालिका अंजली पाटील,भारती मुथा आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सदर कार्यशाळेचे उद्घाटक गणेश पुरी आणि प्रमुख मार्गदर्शक अनिल कवडे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

या कार्यशाळेला नगर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close