जाहिरात-9423439946
सहकार

जिल्हा बँक अध्यक्षांची कोपरगाव पीपल्स बॅंकेस भेट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच महानगर बँकेचे अध्यक्ष उदय गुलाबराव शेळके यांनी कोपरगाव पीपल्स बँकेस सदिच्छा भेट दिली आहे.

“सहकार क्षेत्रातील बँकांवर येत असलेल्या अडचणी तसेच यातून मार्गक्रमण करीत संस्था सुस्थितीत चालविणे रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष सांभाळून नफा क्षमता टिकविणे कठीण असतानाही कोपरगाव पीपल्स बँकेने त्यांचा चढा आलेख कायम राखला हि बाब कौतुकास्पद आहे”-गुलाबराव शेळके,अध्यक्ष जिल्हा बँक.

यावेळी त्यांची बँकेचे संचालक मंडळ यांचे समवेत चर्चा व एकूणच बँकेचे आर्थिक स्थितीची माहिती घेतली असता कोपरगाव पीपल्स बँक ही अहमदनगर जिल्ह्यातील नावलौकिक प्राप्त संस्था असून या बँकेचे एकूण निधी,भांडवल पर्याप्तता तसेच एन.पी.ए.प्रमाण याबाबत समाधान व्यक्त केले. सदर बँकेचा असलेला सतत ऑडिट वर्ग अ व सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी नगर जिल्ह्यातील एकमेव बँक ही पीपल्स बँक असल्याचे नमूद केले आहे.
त्यांनी सहकार क्षेत्रातील बँकांवर येत असलेल्या अडचणी तसेच यातून मार्गक्रमण करीत संस्था सुस्थितीत चालविणे रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष सांभाळून नफा क्षमता टिकविणे कठीण असतानाही पीपल्स बँकेने त्यांचा चढा आलेख कायम राखला असल्याचे कौतुक केले आहे. बँकेला नफा क्षमता टिकवायचा असेल तर चांगले कर्जदार शोधून कर्ज वाटप करणे व एन.पी.ए.प्रमाण कमी राखणे आवश्यक आहे.
सदर प्रसंगी पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी सध्या ग्राहकांकरिता डिजिटल बँकिंगच्या दृष्टीने बँक लवकरच आपल्या ग्राहकांना मोबाईल बँकिंग सुविधा सुरू करीत असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ऍड.माधवराव कानवडे,संचालक गणपतराव सांगळे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे,संग्राम देशमुख,पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा,उपाध्यक्ष प्रतिभा शिलेदार,संचालक कैलास ठोळे,सुनील कंगले,रविंद्र लोहाडे,कल्पेश शहा,सुनिल बंब, वसंतराव आव्हाड,यशवंत आबनावे,जनरल मॅनेजर दिपक एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close