जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

कोपरगावात…या पतसंस्थेच्या ठेवी ६०० कोटींच्या वर

जाहिरात-9423439946

कोपरगाव (प्रतिनिधी)

वित्तीय वर्षाच्या अखेरीस ३१ डिसेंबर २०२० रोजी १००० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण करून महाराष्ट्रात अव्वल दर्जा मिळविलेल्या पतसंस्थेचा ३१ मार्च २०२१ या आर्थिक अहवालात सालाबादप्रमाणे या वर्षी देखील ३१ मार्च रोजीच प्रसिद्ध करण्यात समता पतसंस्थेने आघाडी घेतली असून,गत आर्थिक वर्षात समता पतसंस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल ६८ कोटी रुपयांची वाढ होऊन ठेवी ६०० कोटी ६ लाख एवढ्या झाल्या तसेच कर्ज वाटपामध्ये ७२ कोटी रुपयांची वाढ होऊन संस्थेचे कर्ज वाटप ४५० कोटी ५५ लाख एवढे झाले असून गुंतवणुक १७५ कोटी ८० लाख एवढी आहे. संस्थेला ३१ मार्च २०२१ अखेर ७ कोटी २० लाख इतका नफा झालेला आहे अशी माहिती संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली आहे.

“समताने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमध्ये देखील केवळ समता पतसंस्थामध्ये नव्हे,तर बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, त्याचबरोबर व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली पतसंस्था चळवळीमध्ये सर्वप्रथम आणून समताने पतसंस्था चळवळ देखील बँकांपेक्षा कमी नाही हे दाखवुन दिले आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष समता पतसंस्था.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”सहकारी पतसंस्थेच्या चळवळीत अग्रणी असलेल्या समता नागरी पतसंस्थेने वित्तीय वर्षाच्या शेवटी आपला तेरीज ताळेबंद जाहिर करण्याची परंपरा या वर्षी टिकवली असून आज संस्थेची आर्थिक स्थिती जाहिर केली आहे.

सदर प्रसंगी अधिक बोलताना ते पुढे म्हणाले कि,‘गत आर्थिक वर्ष संपत असतानाच लॉक डाऊन जाहीर झाला, तसेच गत वर्षभर कोरोनामुळे सर्वांच्याच व्यवहारांवर परिणाम झाला असताना देखील समताने ठेव वाढ,कर्ज वाढ व गुंतवणूक यामध्ये विविध विक्रम प्रस्थापीत केले आहे.विशेषतः कर्ज वाटपापैकी सोनेतारण कर्ज हे जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे कर्ज आहे,समताचे सोनेतारण कर्ज दि.३१ मार्च २०२० अखेर १८ कोटी रुपये इतकेच होते, ते आता १०० कोटी रुपयांचे आसपास जाऊन पोहोचले आहे.सोने तारण कर्जामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून जलद सेवा ग्राहकांना देण्याचे काम समता पतसंस्था करीत आहे.’ त्याचबरोबर सोनेतारण कर्ज वितरण सुरक्षित होण्यासाठी देखील विविध अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महाराष्ट्रातील पतसंस्था सोने तारण कर्ज वाटपात समताचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन हे कामकाज बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.’

समता पतसंस्थेने वेअर हाऊस कर्ज २७ कोटी तसेच अतिशय नगण्य थकबाकी असलेले मायक्रो फायनान्स मध्ये २५ कोटी कर्ज वाटप केले आहे.संस्थेची सुरक्षित गुंतवणूक १७५ कोटी ८० लाख असून गुंतवणूक, सोनेतारण,वेअर हाऊस कर्ज,मायक्रो फायनान्स हे कधीही उपलब्ध होणारे कर्ज एकूण ३२८ कोटी रुपये आहे.एकूण कधीही उपलब्ध होणारे कर्ज गुंतवणुकीचे प्रमाण ५५% इतके आहे.केवळ कर्ज वाटप न करता मायक्रो फायनान्सने दिलेल्या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालास,स्वदेशी उत्पादनास भारतभर ऑनलाईन विक्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार उद्यमीच्या माध्यमातून ‘कॉप शॉप वर्ल्ड’ अंतर्गत स्थानिक तसेच स्वदेशी उत्पादने ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून विक्रीस प्रारंभ केला असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले.

सदर प्रसंगी पतसंस्थेच्या उपाध्यक्षां श्वेता अजमेरे,संचालक जितेंद्र शहा,व्यवस्थापक सचिन भट्टड, वसुली विभागणप्रमुख जनार्दन कदम,समता कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष सोपान पठारे,आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समताने गत आर्थिक वर्षात तब्बल ७ कोटी रुपयांच्या नफा मिळविलेला आहे. त्याचबरोबर लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाचे अंतर्गत समता पतसंस्थेच्या ७ लाख रुपया पर्यंतच्या ९८ % ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत.’ ‘कर्ज वितरण करताना देखील महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली सिबिल सारखी क्रास प्रणाली यांचा वापर केल्याशिवाय कर्ज पुरवठा करत नाही. त्याचप्रमाणे निम्जा सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेली ई-नोटीस प्रणाली देखील समताने वापरण्यास सुरुवात केलेली आहे.त्याचबरोबर नेटविन इंडिया सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेली शुअर सेल,शुअर पेमेंट या प्रणाली मार्फत देखील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बँकिंग क्षेत्रात आतापर्यंत कोणीही वापर करत असलेले क्लॉऊड बँकिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून समताचे व्यवहार पूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही गावात असलेले ग्राहक आता करू शकत असल्याने समता पतसंस्था महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील बँकिंग क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी सर्वोच्च संस्था ठरली आहे.समताची कर्ज वसुली देखील समताचे टीमने कोरोना व लॉक डाऊनचे काळात अतिशय शांत व संयमी पद्धतीने केली असून एकही थकबाकीदाराची तक्रार न येऊ देता अत्यल्प एन.पी.ए. ठेवण्यात यश आले आहे.यात समताचे २५० चे वर संख्येने असेलेले कर्मचारी,अधिकारी यांचा मोलाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार कोयटे यांनी शेवटी काढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close