सहकार
…या विकास संस्थेच्या सभासदांना १०टक्के लाभांश वाटप
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना दीपावली निमित्त सभासदांच्या बँक खात्यावर दहा टक्के लाभांश सभासदांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र केरूनाथ चेचरे व उपाध्यक्ष अशोक सुखदेव चेचरे यांनी दिली आहे.
संस्थेचे एकूण १८२ सभासद असून दीपावली निमित्त एक लाख ६७ हजार ७५० रूपये संस्थेच्या सभासदांना दिलेली आहे.तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत रक्कम ३२ हजार ४९० रूपये के.सी.सी. खाते जमा करण्यात आलेली आहे. लाभांश वाटप करण्यात पूर्वी संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली त्यात १० टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी संस्थेचे मार्गदर्शक माजी संचालक केरुनाथ चेचरे, माजी संचालक भाऊसाहेब चेचरे,लहानु चेचरे,कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे, सरपंच स्मिताताई चेचरे,उपसरपंच सुरेश चेचरे,माजी सरपंच गणेश चेचरे, वसंत नेहे, उपसभापती सुरेखा इनामके,गणपत नवसाजी चेचरे, कृष्णा चेेचरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. संस्थेच्या यशामागे लक्ष्मण चेचरे, प्रविण चेचरे,गोरक्ष गोपाळे,वसंत नेहे, हरिभाऊ चेचरे,किरण इनामके,लक्ष्मण तांबे,चंद्रकला दरंदले,मंदाबाई चेचरे यांचे मोलाचे लाभले आहे, ही संस्था आ. राधाकृष्ण विखे,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पथावर काम करत असून संस्थेचे यशामागे संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष यांंचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.तसेच जिल्हा बँकेचे प्रवरानगर शाखा अधिकारी सचिन बुचुडे संस्थेचे सचिव आर.व्ही.चेचरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.