सहकार
..या सेवा संस्थेचा सभासदांना नऊ टक्के लाभांश
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात सहकारात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या धामोरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने कोरोनाच्या प्रतिकूल काळातही आपल्या सभासदांना दिवाळीसाठी वीस टक्के लाभांश जाहीर करून कर्मचाऱ्यांना दोन महिन्याच्या पगारा इतका बोनस नुकताच दिल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वर्तमानात कोरोना साथीचे सर्वत्र थैमान घातले आहे.त्यामुळे सर्वत्र नोकऱ्या गेल्या आहेत.तर अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे.अनेक उद्योग बंद पडले आहे.तर अनेक संस्था मेटाकुटीला आल्या आहेत.त्याला सहकारी संस्था अपवाद नाही.मात्र याला अपवाद ठरली आहे ती धामोरी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था या संस्थेने जेष्ठ संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सभासदांना नऊ टक्यांचा लाभांश वाटप केला आहे.
वर्तमानात कोरोना साथीचे सर्वत्र थैमान घातले आहे.त्यामुळे सर्वत्र नोकऱ्या गेल्या आहेत.तर अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे.अनेक उद्योग बंद पडले आहे.तर अनेक संस्था मेटाकुटीला आल्या आहेत.त्याला सहकारी संस्था अपवाद नाही.मात्र याला अपवाद ठरली आहे ती धामोरी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था.कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील स्व.पंडितराव कुलकर्णी यांनी स्थापन केलेली धामोरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था हि नामांकित संस्था म्हुणून ओळखली जाते.या संस्थेने या प्रतिकूल काळातही आपला लौकिक राखला असून या वर्षी त्यांनी आपल्या सभासदांना तब्बल नऊ टक्के लाभांश जाहीर केला आहे. तर आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दोन महिन्याचा पगार हा बोनस म्हणून जाहीर करून त्याचे वाटप नुकतेच केले आहे.त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा लाभांश त्यांनी संस्थेचे मार्गदर्शक चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते तर भगवानराव माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेश वितरण करण्यात आला आहे.त्याचा स्वीकार संस्थेचे जेष्ठ संचालक भास्करराव वाघ यांनी स्वीकारला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी,गौतम बँकेचे संचालक पुंडलिक माळी,विकास संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब अहिरे,अरुणराव भाकरे,देवराम माळी,भाऊसाहेब खिलारी,सुभाष उसरे,उपप्राचार्य नारायण बारे,भाऊसाहेब माळी,श्री वराडे सर,माणिक सोमासे, अनिल दरेकर,सतीश कोळपे,दिलीपराव माळी,निवृत्ती शिंदे,दिलीप खिलारी,आदी मान्यवरांसह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक नारायण बारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव मनोज कुलकर्णी यांनी मानले आहे.