जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या बँकेला ११७ कोटींचा नफा-माहिती

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या गौतम सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये लक्षवेधी कामगिरी करतांना विक्रमी ०१ कोटी १७ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संजय आगवन,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

‘कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पद्मविभुषण डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४/२५  या चालू आर्थिक वर्षात १ कोटी ०१ लाख  २४ हजार ६२४  रुपये निव्वळ नफा झाला आहे”-देवेंद्र रोहमारे,अध्यक्ष,शरदचंद्र पवार नागरी पतसंस्था,कोळपेवाडी.

   दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की,”नुकत्याच संपेलेल्या वित्तीय वर्षात गौतम सहकारी बँक प्रगती करत आहे.सचोटी व बँकेचे ठेवीदार,कर्जदार यांच्या विश्वासावर दरवर्षी नफ्यात वाढ करीत आहे.बँकेच्या अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात एकूण नऊ शाखा कार्यरत आहे.बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँकेच्या सर्व ग्राहकांना डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे बँकेचा बहुतांश कारभार पेपरलेस होवून बँकेचा आर्थिक खर्च वाचविला आहे.३१ मार्च २०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ०१ कोटी ५० लाखाच्या तरतुदी करून बँकेस ०१ कोटी १७ लाखाचा निव्वळ नफा मिळाला आहे.आज मितीस बँकेचे वसूल भाग भांडवल ०६ कोटी ३५ लाख आहे.बँकेच्या ठेवी १२४ कोटीच्या असून बँकेने रू.८० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे.गुंतवणूक ५७ कोटी ५८ लाख असून सी.डी.रेशो ६४.७७ % आहे.राखीव निधी व इतर निधी १६ कोटी ५८ लाख इतका आहे.रिझर्व बँकेच्या माफदंडाप्रमाणे सी.आर.ए.आर.९% आवश्यक असून आपल्या बँकेचा तो १८.६८% आहे.बँकेचे नक्त मुल्य १२ कोटी ५४ लाख इतके आहे.ग्रास एनपीए ६.५३% इतका असुन निव्वळ एनपीए शुन्य टक्के राखला आहे.वार्षिक सभेत मान्यता घेऊन सभासदांना लाभांश वाटप करणार असल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.बँकेने केलेल्या या कामगिरीबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांनी बँकेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेला १.१कोटींचा नफा- माहिती

   दरम्यान कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पद्मविभुषण डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४/२५  या चालू आर्थिक वर्षात १ कोटी ०१ लाख  २४ हजार ६२४  रुपये निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.संस्थेकडे ४३ कोटी ७८ लाख ठेवी असून कर्जवाटप २८ कोटी ६८ लाख आहे.वसूल भाग भांडवल ०१ कोटी १८ लाख, राखीव व इतर निधी १२ कोटी ३० लाख तसेच गुंतवणूक ३० कोटी ५६ लाख आहे. निव्वळ एनपीए ०% असून थकबाकी प्रमाण २.३४% असल्याची माहिती मुख्यव्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close