सहकार
उद्योगपती दूध धंद्यात का येत नाही – …या राज्यपालांचा सवाल

न्युजसेवा
कोपरगाव,संवत्सर (प्रतिनिधी)
उद्योगपती दूध धंद्यात का येत नाही या धंद्यातील तोट्याचे अर्थकारण त्याला माहिती आहे.हा जोड व्यवसाय केवळ शेतकरीच करू शकतो असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

राज्यातील खंडकरी शेतकरी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने माजी सभापती मच्छिंद्र टेके यांच्या शिष्टमंडळाने मोठा तिरंगी हार अर्पण मंत्री राधाकृष्ण विखे यांना देऊन गौरव केला आहे.

गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पा.तालुका सहकारी संघाच्या १.५ मेगा व्हॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प,मिल्क क्लेरीफायर मशीन,कंट्यूटुनियस खवा मेकिंग मशीन,पाणी शुध्दीकरण यंत्रणा व पाणी साठवण तलाव आदीं प्रकल्पाचा उद्घाटन शुभारंभ आज दि.२० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता संघाच्या सहजानंदनगर या कार्यस्थळावर संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री राधाकष्ण विखे हे होते.

सदर प्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मान्यवर आमदार आदींचा सत्कार करण्यास निमंत्रित केले असल्याचे दिसून आले आहे.मात्र सदर ठिकाणी निमंत्रण पत्रिकेत आ.आशुतोष काळे यांचे नाव असूनही ते उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे.

सदर प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे,माजी खा.सुजय विखे,वैजापूरचे आ.रमेश बोरनार,नेवासा आ.विठ्ठल लंघें,पारनेर आ.काशिनाथ दाते,संगमनेर आ.अमोल खताळ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,श्रीनिवासन,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राजेंद्र जाधव,माजी सभापती मच्छिंद्र टेके,कृष्णा परजणे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास कोपरगाव,राहाता तालुक्यातील शेतकरी,दूध उत्पादक शेतकरी आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान गोदावरी दूध संघाने राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचेसह प्रमुख पाहुण्यांचे आगमनासाठी डी.जे.सारख्या कर्णकर्कश वाद्याऐवजी पारंपरिक वाद्य सनई चौघडा वाजवून लक्ष वेधून घेतले होते त्याचे सर्वांनी स्वागत केले असेल तरी तोफा मात्र मोठ्या वापरून कोपरगाव शहर हादरून सोडले होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राजेश परजणे यांचे गोदावरी दूध संघाच्या १.५ मेगावट प्रकल्प,दूध शुध्दीकरण प्रकल्प उद्घाटन केले असल्याचे जाहीर केले आहे.आपल्या डेरीत ०५ तर तर परजणे यांच्या गोदावरी दूध संघास १० लिटर दुधाचे सुरुवात केली होतीच.
राजेश परजणे हे राधाकृष्ण विखे यांना विचारतात की नाही हे मला माहिती नाही पण ते विचारत असावेत असा अंदाज आहे.(हशा) आपण २१ वर्षाचा (पत्रकार) असताना पद्मश्री विठ्ठलराव विखे व शंकरराव कोल्हे यांची मुलाखत घेन्यासाठी आलो होतो.ती विवेक साप्ताहिकात छापली होती.त्यावेळी यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे यांची कडवी लढत झाली होती आणि संभाजीनगर उच्च न्यायालयात ती दाखल झाल्याची आठवण करून दिली आहे.विखेंच्या चौथ्या पिढीत आपला संबंध असल्याचे सांगितले आहे.सहकारात काही धेय्य ठेवून वागले पाहिजे.काही संघाचे पदाधिकारी एकाच वेळी प्रवासाचे भाडे काढतात.ही प्रवृत्ती वाईट असल्याचे सांगून राजस्थान मध्ये सहकारी दूध संघ चालतात पण येथे साखर आणि दूध सहकारात गळ्यात हात घालुन चालतात.पण कोपरगाव तालुक्यात साखर आणि दूध एकत्र येत नाही ( कोल्हे आणि परजणे गट) असे म्हणून कोपरखिली मारली आहे.(मोठा हशा) त्यावेळी त्यांनी दूध भेसळीवर आपले लक्ष वेधून घेतले.जो ग्राहक वर्तमानपत्रात दूध भेसळीची बातमी वाचतो ती वाचल्यावर तो दूध घेत नाही.अशा बातम्या का येतात याकडे दूध संघांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे.दूध उत्पादक शेतकऱ्यांमुळेच भारत जगात एक क्रमांक वर आहे.राज्यात दूध वापर का होत नाही याचा विचार करण्याची गरज आहे.प्रकृती ठीक ठेवायची असेल तर दूध वापर वाढवा असे आवाहन करून आपल्या भाषणाचा बागडे यांनी समारोप केला आहे.

दरम्यान गोदावरी तालुका सहकारी दूध संघाची स्थापना ही १९७६ साली झालेली असताना व अद्याप ४९ वर्षे पूर्ण झालेली असताना दूध संघ चालकांनी थेट ‘सुवर्ण महोत्सवी वर्ष’ का जाहीर केले हे समजायला मार्ग नाही.ही घाई का करण्यात आली याची उपस्थितांमध्ये चर्चा रंगून आलेली आढळली आहे.
सदर प्रसंगी जलसंपदा मंत्री विखे हे बोलताना म्हणाले की,”राज्यातील दुधाला अनुदान देण्याची संकल्पना हरिभाऊ बागडे यांनी मांडली होती.सहकाराची वाटचाल पाहता आज एखाद्या सहकारी संस्थेने आपली ५० वर्षे पूर्ण करणे आश्चर्याची आणि कौतुकाची बाब म्हटली पाहिजे असे म्हणून संस्थेचे अध्यक्ष राजेश परजणे आणि त्यांच्या संचालकांचे कौतुक केले आहे.सोर्टेड सिमेन्स मुळे गायींना केवळ कालवडींचे उत्पादन होणार आहे.त्यामुळे आज ८३ लाख राज्याचे उत्पादन आणखी मोठ्या प्रमाणात होणार आहे.मदर डेअरी शिर्डी जवळ सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे.अमुल दूध संघाची रोजची दूध उत्पादन क्षमता २.१० कोटी लिटर आहे.त्यामुळे आपण टीकलो असे सागितले आहे.महानंदा ही राष्ट्रीय मदर डेअरीला दिल्याने आपण भविष्यात टिकणार आहे.नगर जिल्हा प्रती दीन १० लाख लिटर विक्रमी उत्पादन होत आहे.राज्यात,’डंके की चोट’ पर राज्यात सरकार आले आहे.त्यावेळी त्यांनी आ. खताळ यांची ओळख करून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना नाक खाजून दाखवले आहे.२००५ साली पश्चीमेचे ५५ टी.एम.सी.पाणी आणणार असल्याचे अभिवचन दिले आहे हे काम,’डंके की चोट’ पर करणार असल्याची गर्जना केली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले त्यावेळी गोदावरी दूध संघाने बंद पिशवी दूध विक्री सुरू केली.पशू निदान प्रयोग शाळा,बायफचा उपक्रम सुरू केला आहे.आज पेढ्याचा खवा यंत्र सुरू केले आहे.कर्मचाऱ्याने ३.५ कोटींची निवास व्यवस्था केली आहे.कर्मचाऱ्यांना ७३-७४ लाखांचा विमा संरक्षण दिले आहे.एन.डी.बी.ला ३.५ लाख लिटर दूध दिले जाणार आहे.शेतकऱ्यांच्या दुधाला ०७ रुपये अनुदान सुरू ठेवा असे आवाहन केले आहे.सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेकडे वळवून नदीजोड प्रकल्प पूर्ण करा व कोपरगाव तालुक्यातील दुष्काळ दूर करा असे आवाहन त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना केले आहे.
सदर प्रसंगी सूत्रसंचलन राजश्री पिंगळे मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार विवेक परजणे यांनी मानले आहे.