सहकार
सहकारी परिषदेला मोठ्या संख्येनं सदस्य उपस्थित राहणार-…यांची माहिती

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग महत्वपूर्ण असल्यामुळे तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे ७०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा वतीने शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद १२ देशातील आणि ३ राज्यातील सहकारी पतसंस्था प्रतिनिधींच्या उपस्थितीत सहकारात होत असलेल्या विविध बदलांचे आदान प्रदान करून मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र शासन सहकार विभाग,असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन,फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्यामुळे शिर्डी येथे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे.या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तालुक्यातील पतसंस्था पदाधिकारी यांची बैठक नुकतीच समता सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली आहे.त्यावेळी ते बोलत होते.
प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेने १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी कोपरगाव तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे.
त्यावेळी या चळवळीचे नेते कोयटे जी जबाबदारी देतील ती आपण नेटाने पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या वेळी कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरी,ग्रामीण सहकारी व पगारदार पतसंस्थांनी चे सर्व संचालक,पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन जेष्ठ संचालक राजेंद्र देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांनी मानले आहे.