सहकार
कोपरगावात ठेक्याच्या बिलावरून सत्ताधारी गटात तुंबळ वाद
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज संपन्न झालेल्या मासिक बैठकीत प्रशासन काळात तीळवणी (शिरसगाव) उपबाजार येथे टाकण्यात आलेल्या मुरुमाच्या बारा लाख रुपयांच्या बिलावरून सत्त्ताधारी गटातील पदाधिकारी व त्याच गटाचे माजी नगराध्यक्ष व त्यांचे सुपुत्र यांच्यात वादाची ठिणगी पडली असून यात चांगलाच अकाली शिमगा रंगला असल्याची विश्वासानिय माहिती हाती आली आहे.त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध संपन्न होऊन वर्षाचा कालावधी उलटला असून वर्तमानात सभापतीपदी माजी आ.स्नेहलता कोल्हे गटाचे संचालक साहेबराव रोहोम यांची नियुक्ती झालेली आहे.त्या पूर्वी या ठिकाणी कोरोना काळात प्रशासक असल्याने बरेच दिवस प्रशासक राज होते.या कालखंडात तालुक्यातील तिळवणी (शिरसगाव)येथील उपबाजारात पावसाळ्यात दलदल होऊ नये म्हणून सुमारे बारा लाख रुपयांचा मुरूम टाकण्याचे काम सत्ताधारी गटाचे कोपरगाव शहरातील माजी नगराध्यक्ष यांचे सुपुत्रास दिले होते.विशेष म्हणजे सदर काम हे सुमारे ३९ टक्के कमी दराने दिले होते हे विशेष ! मात्र सदर काम कसे झाले याबाबत वादविवाद निर्माण झाले असून त्या बिलाची सुमारे ०२ लाख रुपयांची रक्कम बाकी असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.मात्र संबंधित ठेकेदाराने व त्यांच्या सुपुत्राने सदर दोन लाख रुपयांऐवजी तब्बल १० लाख रुपयांचे म्हणजे अधिकचे ०८ लाख रुपयांचे बिल सादर केल्याने वादाची ठिणगी पडली असल्याची माहिती आहे.त्यामुळे सदर अधीजचे ०८ लाख रुपयांचे बिल देण्यास विद्यमान सत्ताधारी गटाच्या पदाधिकाऱ्याने नकार दिल्याने हा वाद निर्माण झाला आहे.दोन वर्षापूर्वीचे शिल्लक बिल देण्यास आपण तयार असताना अधिकचे बिल कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे हे रणकंदन निर्माण झाले असून त्यावरून दोन्ही कोल्हे गटाचे पदाधिकारी असतांना त्यांची बैठक संपल्यावर चांगलीच उचलटाक झाली असून शेवटी आ.काळे गटाचे बाजार समितीचे जेऊर पाटोदा येथील संचालक यांनी मधस्ती केल्याचे हा वाद कसाबसा मिटला असल्याची माहिती आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने सत्ताधारी गटाच्या पदाधिकाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी त्यास नकार दिला नाही.मात्र अन्य संचालक आणि प्रशासनातील माहितगार सुत्रानी यास दुजोरा दिला आहे.त्यामुळे हा वाद ईशान्य गडावरील वरिष्ठ राजकीय न्यायालयात जाणार हे उघड असून आधीच या नगराध्यक्षांवर वरिष्ठ ईशान्य गडावरील नेत्यांची ऐतराजी असल्याने हा अधिकचा वाद त्यांना चांगलाच नडणार असल्याचे चित्र दिसत आहे.