जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या नेत्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यास पुढाकार-ह.भ.प.चिखलीकर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

माजी खा.स्व.शंकरराव काळे यांनी सामाजिक तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या ध्येयाने त्यांनी नोकरी सोडली व गोरगरिबांच्या शिक्षणासाठी धडपडणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यात उडी घेऊन शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी वाहून घेतले असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.पुरोषोत्तम महाराज चिखलीकर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ११ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी बोलतांना ह.भ.प.पुरोषोत्तम महाराज चिखलीकर.

“गोरगरिबांच्या शिक्षणासाठी धडपडणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यात उडी घेऊन माजी खा.शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी वाहून घेतले.१५ वर्षे रयतचे अध्यक्षपद सांभाळताना या संस्थेचा शैक्षणिक विस्ताराला जोराची गती दिली होती”-ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज उखळीकर.

राज्याचे माजी शिक्षण राज्य मंत्री व खा.शंकरराव काळे यांचे ११ व्या पुण्यस्मरण नुकतेच कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात संपन्न झाले त्यावेळी आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी ह.भ.प.पुरोषोत्तम महाराज पाटील चिखलीकर बोलत होते.

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या ११ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करतांना माजी आ.अशोक काळे,पुष्पाताई काळे,स्नेहलताई शिंदे,अनिल शिंदे,आ.आशुतोष काळे,चैताली काळे,अॅड.प्रमोद जगताप,मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,उपाध्यक्ष नारायण मांजरे आदी.

सदर प्रसंगी माजी आ.अशोक काळे,गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे,स्नेहलता शिंदे,अनिल शिंदे,आ.आशुतोष काळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे,अॅड.प्रमोद जगताप,कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन,उपाध्यक्ष नारायण मांजरे,ज्येष्ठ नेते बाळासाहेब कदम,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,विश्वास आहेर,ज्ञानदेव मांजरे,बबनराव कोळपे,माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे, संचालक दिलीप बोरनारे,सुधाकर रोहोम,सचिन चांदगुडे,अशोक मवाळ,सुनील मांजरे,वसंतराव आभाळे,मनोज जगझाप,शंकरराव चव्हाण,तसेच बाबासाहेब कोते,सतिश कृष्णानी,अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे,बाबुराव कोल्हे,संभाजी काळे,राजेंद्र गिरमे,अशोक काळे,राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा वैशाली आभाळे, बाजार समितीचे संचालक शिवाजी देवकर,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,माजी नगरसेवक मंदार पहाडे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी सुनील कोल्हे,आसवनी विभगाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य,संलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,जिल्हा परिषद,पंचायत समितीचे माजी सदस्य,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समाजकारण आणि राजकारणाची टक्केवारी राजकीय व्यक्तींकडून सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही.परंतु कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते.त्यांची समाजाशी बांधिलकी असल्यामुळे त्यांनी समाजसेवेळा प्राधान्य दिले असल्याचे सांगीतले आहे.राजकारणात फक्त समाजाचा विचार केला.फक्त राजकीय क्षेत्रातच नव्हे तर त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे वलय होते.ह.भ.प.तुकाराम महाराज खेडलेकर हे साहेबांचे गुरु होते. राजकारणी व्यक्तींना महाराज मंडळी सहसा स्विकारीत नाही.राजकीय क्षेत्रात मोठ्या योग्यतेचे कर्मवीर शंकरराव काळे यांचे समाजकार्य असून आध्यात्मिक क्षेत्रासाठी देखील त्यांनी मोठी मदत केली आहे.जयंती त्या व्यक्तीची होत नसून त्याने केलेल्या कार्याची व समाजासाठी दिलेल्या योगदानाची जयंती होत असते.त्या व्यक्तीने केलेल्या योगदानाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्या व्यक्तींचे स्मारक व पुतळे उभारले जातात.

कर्मवीर शंकरराव काळे यांनी जीवनभर समाजाचा विचार केला.त्यांनी ठरवल असते तर आपल्या स्वमालकीच्या असंख्य शाळा-महाविद्यालय सहजपणे त्यांनी उभारले देखील असते.परंतु गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्थेचे हित जोपासत निष्काम सेवा केली.त्यांच्या कार्याचा व निस्वार्थी सेवेचा सुगंध नेहमीच राज्यात दरवळत राहणार असून त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणे हि त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close